Home /News /sport /

IPL 2020 : हैदराबादला हरवत दिल्लीची फायनलमध्ये धडक, आता मुंबईशी महामुकाबला

IPL 2020 : हैदराबादला हरवत दिल्लीची फायनलमध्ये धडक, आता मुंबईशी महामुकाबला

आयपीएल (IPL 2020) प्ले-ऑफच्या दुसऱ्या क्वालिफायर मॅचमध्ये दिल्ली (Delhi Capitals)ने हैदराबाद (SRH)चा पराभव केला आहे. याचसोबत दिल्लीने आयपीएलची फायनल गाठली आहे. आता 10 नोव्हेंबरला मुंबई (Mumbai Indians)विरुद्ध दिल्ली यांच्यात आयपीएलची फायनल रंगणार आहे.

पुढे वाचा ...
    अबु धाबी, 8 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) प्ले-ऑफच्या दुसऱ्या क्वालिफायर मॅचमध्ये दिल्ली (Delhi Capitals)ने हैदराबाद (SRH)चा 17 रननी पराभव केला आहे. याचसोबत दिल्लीने आयपीएलची फायनल गाठली आहे. आता 10 नोव्हेंबरला मुंबई (Mumbai Indians)विरुद्ध दिल्ली यांच्यात आयपीएलची फायनल रंगणार आहे. दिल्लीने ठेवलेलं 190 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात खराब झाली. फॉर्ममध्ये असलेला डेव्हिड वॉर्नर फक्त 2 रन करून आऊट झाला. तर प्रियम गर्ग 17 रन करून आणि मनिष पांडे 21 रन करून माघारी परतला. हैदराबादकडून एकट्या केन विलियमसनने किल्ला लढवला, पण केन विलियमसनची विकेट गेल्यानंतर मात्र हैदराबादसाठी हे आव्हान कठीण झालं. विलियमसन 45 बॉलमध्ये 67 रन करुन आऊट झाला. शेवटच्या काही ओव्हरमध्ये जास्त रनची गरज असताना अब्दुल समदने 16 बॉलमध्ये 33 रन केले, पण त्यालाही हैदराबादला जिंकवता आलं नाही. दिल्लीकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर मार्कस स्टॉयनिसला 3 विकेट मिळाल्या. अक्सर पटेललाही एक विकेट घेण्यात यश आलं. या मॅचमध्ये दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला होता. या मॅचमध्ये पहिल्यांदाच मार्कस स्टॉयनिस ओपनिंगला आला होता. स्टॉयनिसला ओपनिंगला पाठवण्याची ही रणनीती दिल्लीच्या कामी आली. त्याने शिखर धवनसोबत दिल्लीला 8.2 ओव्हरमध्येच 86 रनची ओपनिंग पार्टनरशीप करून दिली. तर शिखर धवनने 50 बॉलमध्ये 78 रनची खेळी केली. हेटमायरने 22 बॉलमध्ये नाबाद 42 रनची फटकेबाजी केल्यामुळे दिल्लीला 189 रनपर्यंत मजल मारता आली. हैदराबादकडून संदीप शर्मा, जेसन होल्डर आणि राशिद खान यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या