मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2020 : हुडाने पंजाबला सावरलं, चेन्नईला विजयासाठी 154 रनची गरज

IPL 2020 : हुडाने पंजाबला सावरलं, चेन्नईला विजयासाठी 154 रनची गरज

IPL 2020 दीपक हुडा (Deepak Hooda) च्या नाबाद अर्धशतकी खेळीमुळे पंजाब (KXIP) ला चेन्नई (CSK) विरुद्धच्या मॅचमध्ये 153 रनपर्यंत मजल मारता आली आहे.

IPL 2020 दीपक हुडा (Deepak Hooda) च्या नाबाद अर्धशतकी खेळीमुळे पंजाब (KXIP) ला चेन्नई (CSK) विरुद्धच्या मॅचमध्ये 153 रनपर्यंत मजल मारता आली आहे.

IPL 2020 दीपक हुडा (Deepak Hooda) च्या नाबाद अर्धशतकी खेळीमुळे पंजाब (KXIP) ला चेन्नई (CSK) विरुद्धच्या मॅचमध्ये 153 रनपर्यंत मजल मारता आली आहे.

अबु धाबी, 1 नोव्हेंबर : दीपक हुडा (Deepak Hooda) च्या नाबाद अर्धशतकी खेळीमुळे पंजाबला चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्ये 153 रनपर्यंत मजल मारता आली आहे. टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतल्यानंतर चेन्नईच्या लुंगी एनिगीडीने पंजाबला सुरुवातीलाच धक्के दिले. 72 रनवर पंजाबच्या 4 विकेट गेल्या होत्या, पण दीपक हुडाने एका बाजूने किल्ला लढवला. हुडा 30 बॉलमध्ये 62 रनवर नाबाद राहिला. केएल राहुल आणि मयंक अग्रवाल या दोघांनाही चांगली सुरुवात मिळाली, पण त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मयंक अग्रवाल 26 रनवर आणि केएल राहुल 29 रनवर आऊट झाले. प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याचं स्वप्न कायम ठेवण्यासाठी पंजाबला आजचा सामना जिंकावाच लागणार आहे. हा सामना जिंकला तरीदेखील त्यांना इतर टीमच्या कामगिरीवर अवलंबून राहावंच लागेल, पण जर पंजाबने हा सामना गमावला, तर मात्र त्यांच्यासाठी प्ले-ऑफचा दरवाजा बंद होईल.

आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात चेन्नई (CSK) आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरत आहे. पंजाबविरुद्धच्या या मॅचमध्ये चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. प्ले-ऑफ गाठण्यासाठी या मॅचमध्ये पंजाब (KXIP)ला विजय गरजेचा आहे. तर चेन्नईचं प्ले-ऑफचं आव्हान आधीच संपुष्टात आलं आहे. या मॅचसाठी पंजाबने टीममध्ये एक बदल केला आहे. ग्लेन मॅक्सेवलच्या जागी जेम्स नीशमला स्थान देण्यात आलं आहे, तर चेन्नईने टीममध्ये तीन बदल केले आहेत. वॉटसन, सॅन्टनर आणि कर्ण शर्मा यांच्याऐवजी फाफ डुप्लेसिस, इम्रान ताहीर आणि शार्दुल ठाकूर यांचा टीममध्ये समावेश झाला आहे.

पॉईंट्स टेबलमध्ये पंजाबची टीम पाचव्या क्रमांकावर आहे. पंजाबने 13 पैकी 6 मॅच जिंकल्या असून 7 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. तर चेन्नई पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या म्हणजेच आठव्या क्रमांकावर आहे. चेन्नईने 13 पैकी 5 मॅचमध्ये विजय मिळवला असून 8 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला.

चेन्नईची टीम

फाफ डुप्लेसिस, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, एमएस धोनी, एन जगदीसन, रविंद्र जडेजा, सॅम करन, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, लुंगी एनगिडी, इम्रान ताहीर

पंजाबची टीम

केएल राहुल, मयंक अग्रवाल, क्रिस गेल, निकोलस पूरन, मनदीप सिंग, जेम्स निशम, दीपक हुडा, क्रिस जॉर्डन, मुरुगन अश्विन, रवी बिष्णोई, मोहम्मद शमी

First published: