अबु धाबी, 1 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) च्या प्ले-ऑफच्या शर्यतीमधून पंजाब (KXIP)बाहेर झाली आहे. चेन्नई (CSK)विरुद्धच्या मॅचमध्ये त्यांचा 9 विकेटने पराभव झाला. पण पंजाबच्या दीपक हुडा (Deepak Hooda)ने धडाकेबाज अर्धशतक केलं. केएल राहुल, मयंक अग्रवाल, निकोलस पूरन आणि क्रिस गेल यांच्यासारखे दिग्गज अपयशी ठरले असताना हुडाने 30 बॉलमध्ये नाबाद 62 रन केले. हुडाच्या अर्धशतकामुळे पंजाबला 153 रनपर्यंत मजल मारता आली.
दीपक हुडाच्या अर्धशतकीय खेळीमध्ये 4 सिक्स आणि 3 फोरचा समावेश होता. हुडाने 206 च्या स्ट्राईक रेटने रन केले. 68 आयपीएल मॅच खेळणाऱ्या दीपक हुडाचं हे दुसरं शतक होतं.
दीपक हुडाने 5 वर्षानंतर आयपीएलमध्ये अर्धशतक केलं. याआधी 2015 साली हुडाने आयपीएलमध्ये अर्धशतक केलं होतं. दीपक हुडाला दुसरं अर्धशतक करायला 48 इनिंग लागल्या. आयपीएलमध्ये सर्वाधिक इनिंगनंतर अर्धशतक करण्याचा रेकॉर्ड युसुफ पठाणच्या नावावर आहे. युसुफ पठाणने 49 इनिंगनंतर अर्धशतक केलं होतं.
चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्ये दीपक हुडा सहाव्या क्रमांकावर बॅटिंगला आला होता. या क्रमांकावर हुडाने केलेल्या 62 रन आयपीएल इतिहासात सर्वाधिक आहेत. याआधी हार्दिक पांड्याने सहाव्या क्रमांकावर 60 रनची खेळी केली होती. तसच सहाव्या क्रमांकावर पंजाबकडून सर्वाधिक रन करण्याचा रेकॉर्डही हुडाने आपल्या नावावर केला. याआधी सॅम करनने पंजाबकडून सहाव्या क्रमांकावर नाबाद 55 रनची खेळी केली होती.
दीपक हुडाच्या नाबाद 62 रनच्या जोरावर पंजाबने 20 ओव्हरमध्ये 153 रन केले. चेन्नईकडून लुंगी एनगिडीने 4 ओव्हरमध्ये 39 रन देऊन 3 विकेट घेतल्या, तर ताहिर, जडेजा आणि ठाकूर यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.