Home /News /sport /

IPL 2020 : वॉर्नर म्हणतो, 'हा आहे आम्हाला सापडलेला सर्वोत्तम खेळाडू'

IPL 2020 : वॉर्नर म्हणतो, 'हा आहे आम्हाला सापडलेला सर्वोत्तम खेळाडू'

आयपीएल (IPL 2020) च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये दिल्ली (Delhi Capitals)ने हैदराबाद (SRH) ला पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला. त्यामुळे हैदराबादचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आले. हैजराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) याने खेळाडूंचे कौतुक केलं

पुढे वाचा ...
    अबु धाबी, 10 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये दिल्ली (Delhi Capitals)ने हैदराबाद (SRH) ला पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला. त्यामुळे हैदराबादचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आले. सामन्यानंतर बोलताना हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) याने वेगवान बॉलर टी. नटराजन (T.Natrajan) याचे तोंड भरून कौतुक केले. स्पर्धेतील टीमचे आव्हान संपुष्टात आले असले तरीदेखील केन विलियम्सन, अब्दुल समद आणि टी. नटराजन यांनी आपल्या खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी नटराजन याचे कौतुक करताना वॉर्नरने तो आम्हाला सापडलेला उत्तम खेळाडू असल्याचे म्हटले आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेतलेल्या टॉप 10 खेळाडूंमध्ये नटराजन याचा समावेश आहे. 16 विकेटसह तो या यादीत दहाव्या क्रमांकावर आहे. या स्पर्धत त्याने 16 मॅचमध्ये 62.5 ओव्हरमध्ये 504 रन दिल्या आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट 8.02 इतका होता. रविवारी झालेल्या क्वालिफाअर मध्ये नटराजन याने दिल्लीविरुद्ध डेथ ओव्हरमध्ये आपल्या बॉलिंगने सर्वांची मने जिंकली. त्याच्या धारदार बॉलिंगच्या बळावर हैदराबादने दिल्लीला 189 रनमध्ये रोखले. परंतु हैदराबादच्या बॅट्समनना या लक्ष्याचा पाठलाग करण्यात अपयश आले आणि त्यांचा 17 रननी पराभव झाला. हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 172 रनच करता आल्या. डेव्हिड वॉर्नरने राशिद खान आणि मनीष पांडे यांचेदेखील कौतुक केले. राशिद खान या आयपीएल स्पर्धेतील सर्वात इकोनॉमिकल बॉलर आहे. संपूर्ण स्पर्धेत त्याचा इकॉनॉमी रेट हा केवळ 5.37 इतका होता. त्याचबरोबर मनीष पांडे याने देखील संपूर्ण स्पर्धेत काही उत्तम खेळी करून आपल्या टीमला अडचणीतून बाहेर काढले होते. वॉर्नरने दिल्लीविरुद्धच्या सामन्यातील खराब फिल्डिंगवरदेखील भाष्य केलं. कॅच सोडल्यास कोणतीच टीम विजय मिळवू शकत नसल्याचे त्याने म्हटले. त्यामुळे बॅटिंग आणि बॉलिंगबरोबरच टीमची फिल्डिंदेखील महत्त्वाची असल्याचं त्यानं सांगितलं. मैदानातला तुमचा दृष्टीकोन महत्त्वाचा असल्याचे त्याने म्हटले आहे. त्याचबरोबर पुढच्यावेळी आम्हाला उत्तम कामगिरी करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया वॉर्नरने दिली. मैदानातल्या आमच्या दृष्टीकोनामुळे पराभव झाल्याचं वॉर्नरने मान्य केलं. डेव्हिड वॉर्नरने शेवटच्या मॅचनंतर हैदराबादचा सपोर्ट स्टाफ आणि चाहत्यांचेही आभार मानले. स्पर्धेत टीमने जिथपर्यंत मजल मारली याचा अभिमान असल्याचे देखील तो म्हणाला. या स्पर्धेत हैदराबादने अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला. एलिमिनेटरमध्येही त्यांनी विराट कोहलीच्या बँगलोरचा पराभव करत क्वालिफाअर-2 मध्ये प्रवेश मिळवला होता.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या