दुबई, 3 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या हंगामात पुन्हा एकदा अंपायरच्या खराब निर्णय समोर आला आहे. चेन्नई (Chennai Superkings) आणि हैदराबाद (Sunrisers Hyderabad)यांच्यात झालेल्या मॅचमध्ये फाफ डुप्लेसिस (faf duplessi)22 रनवर आऊट झाला. प्रियम गर्ग (Priyam Garg)ने केलेल्या थ्रोवर फाफ डुप्लेसिसला आऊट देण्यात आलं. पण अनेकांनी थर्ड अंपायरने दिलेल्या या निर्णायवर टीका केली आहे.
चेन्नईच्या बॅटिंगवेळी 6व्या ओव्हरमध्ये डुप्लेसिस रन आऊट झाला. केदार जाधवने फाफला एक रन घेण्यासाठी बोलावलं, पण प्रियम गर्गने जलद गतीने बॉल पकडला आणि विकेट कीपरकडे थ्रो केला. यानंतर जॉनी बेयरस्टो (jonny bairstow) ने बॉल पकडून स्टम्पला लावला. पण यादरम्यान बेयरस्टोच्या हातातून बॉल सटकला. सुरुवातीला बॉल लागून बेल्स पडल्याचं वाटत होतं. पण रिप्ले बघितला असता बॉल स्टम्पला लागला, पण बेल्स बेयरस्टोच्या ग्लोव्ह्जमुळे पडल्याचं दिसत होतं. तरीही थर्ड अंपायरने डुप्लेसिसला आऊट दिलं.

थर्ड अंपायरच्या या निर्णयावर सोशल मीडियावरुनही टीका करण्यात आली. तसंच तज्ज्ञांनीही या निर्णयावर शंका उपस्थित केली. फाफ डुप्लेसिसचं रन आऊट होणं चेन्नईसाठी मोठा धक्का होता. कारण त्यानेच चेन्नईसाटी सर्वाधिक रन केले आहेत. फाफने यंदाच्या स्पर्धेतल्या 4 मॅचमध्ये 2 अर्धशतकं केली होती. फाफचं रन आऊट होणं चेन्नईला चांगलंच महागात पडलं. कारण चेन्नईचे अनुभवी खेळाडू शेन वॉटसन, अंबाती रायुडू आणि केदार जाधवही लवकर माघारी परतले. अखेर चेन्नईचा या मॅचमध्ये 7 रननी पराभव झाला.
आयपीएलमधली मुंबई (Mumbai Indians)विरुद्धची पहिली मॅच जिंकल्यानंतर चेन्नईने लागोपाठ तीन मॅच गमावल्या आहेत. पॉईंट्स टेबलमध्येही चेन्नईची टीम शेवटच्या म्हणजेच 8व्या क्रमांकावर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.