मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020 : धोनीचा धक्का! 6.75 कोटी रुपयांच्या खेळाडूला केलं बाहेर

IPL 2020 : धोनीचा धक्का! 6.75 कोटी रुपयांच्या खेळाडूला केलं बाहेर

IPL 2020 एमएस धोनी (MS Dhoni) ने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करत कोलकाता (KKR)विरुद्धच्या मॅचमध्ये खेळाडूला डच्चू दिला.

  • Published by:  Shreyas

 अबु धाबी, 7 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात चेन्नईची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab)विरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नई (CSK)ने 10 विकेटने दणदणीत विजय मिळवत जोरदार पुनरागमन केलं. या विजयानंतरही चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni)ने घेतलेल्या एका निर्णयामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये धोनीने टीममध्ये फक्त एकच बदल केला, पण या बदलाची अपेक्षा फार कोणी केली नसेल. धोनीने या मॅचमध्ये पियुष चावलाला डच्चू दिला. त्याच्याऐवजी धोनीने कर्ण शर्माला संधी दिली.

कर्ण शर्माला यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्यांदाच खेळण्याची संधी मिळाली. या संधीचं कर्ण शर्माने सोनं केलं. त्याने 4 ओव्हरमध्ये 25 रन देऊन 2 विकेट घेतल्या. टॉसच्या वेळी धोनीने जेव्हा पियुष चावला टीममध्ये नसल्याचं सांगितलं, तेव्हा कॉमेंट्री करत असलेला इरफान पठाणही हैराण झाला.

पियुष चावलाने या मोसमात खेळलेल्या 5 मॅचमध्ये 6 विकेट घेतल्या. चावलाचा इकोनॉमी रेटही 8.88 एवढा आहे. पियुष चावला याला चेन्नई सुपरकिंग्जने 6.75 कोटी रुपयांच्या किंमतीवर लिलावात विकत घेतलं होतं.

चेन्नईची टीम

शेन वॉटसन, फाफ डुप्लेसिस, अंबाती रायुडू, एमएस धोनी, केदार जाधव, रविंद्र जडेजा, ड्वॅन ब्राव्हो, सॅम करन, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, कर्ण शर्मा

First published: