IPL 2020 : चेन्नईच्या पराभवानंतर सेहवागचा केदार जाधववर निशाणा

IPL 2020 : चेन्नईच्या पराभवानंतर सेहवागचा केदार जाधववर निशाणा

आयपीएल (IPL 2020)मध्ये चेन्नई (CSK) ला संघर्ष करावा लागत आहे. विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) ने चेन्नईच्या पराभवावरुन केदार जाधव (Kedar Jadhav) वर निशाणा साधला आहे.

  • Share this:

अबु धाबी, 8 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)मध्ये चेन्नईला संघर्ष करावा लागत आहे. आतापर्यंत झालेल्या 6 मॅचपैकी 4 मॅचमध्ये चेन्नईचा पराभव झाला. बुधवारी झालेल्या कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्येही चेन्नई (CSK)ला पराभव पत्करावा लागला. यानंतर धोनीच्या टीमवर प्रश्न उपस्थित होत आहेत. या मोसमात धोनी पहिल्यांदाच चौथ्या क्रमांकावर खेळायला आला होता. आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या हातात विकेट होत्या आणि आव्हानही फार मोठं नव्हतं. तरीही चेन्नईला सामना जिंकता आला नाही.

वेस्ट इंडिजचा महान खेळाडू ब्रायन लारा म्हणाला की चेन्नईला एका मॅच फिनिशरची गरज आहे. तर विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) ने चेन्नईच्या पराभवावरुन केदार जाधव (Kedar Jadhav) वर निशाणा साधला आहे. बाऊंड्री तर लांबच राहिली, पण केदार एक रन काढण्यासाठीही संघर्ष करत होता, असं सेहवाग म्हणाला.

सेहवाग मॅचनंतर फेसबूकवर 'वीरू की बैठक' या नावाने कार्यक्रम करतो. यामध्ये तो मॅचबद्दलचं त्याचं मत रोखठोकपणे मांडतो. जगाने मागणी केल्यानंतर धोनी चौथ्या क्रमांकावर खेळायला आला. केदार जाधव रनसाठी धावत नव्हता. माझ्या मते त्याला मॅन ऑफ द मॅच दिलं पाहिजे, असा टोला सेहवागने लगावला.

कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये केदार जाधवने केलेल्या खेळीमुळे त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. धोनीची विकेट गेल्यानंतर केदार 17व्या ओव्हरमध्ये बॅटिंगला आला. पहिली रन काढण्यासाठी केदारला 5 बॉल लागले. 20व्या ओव्हरमध्ये चेन्नईला विजयासाठी 26 रन पाहिजे होते, तेव्हा केदारला पहिल्या दोन बॉलवर एकही रन काढता आली नाही. जाधव 12 बॉलमध्ये 7 रन करून नाबाद राहिला. चेन्नईच्या टीमचा या मॅचमध्ये 10 रनने पराभव झाला.

Published by: Shreyas
First published: October 8, 2020, 5:58 PM IST
Tags:

ताज्या बातम्या