Home /News /sport /

IPL 2020 : डुप्लेसिसचं अर्धशतक, जडेजाची फटकेबाजी, दिल्लीला 180 रनचं आव्हान

IPL 2020 : डुप्लेसिसचं अर्धशतक, जडेजाची फटकेबाजी, दिल्लीला 180 रनचं आव्हान

IPL 2020 फाफ डुप्लेसिसचं अर्धशतक आणि रविंद्र जडेजाच्या फटकेबाजीमुळे चेन्नई (CSK)ने दिल्ली (Delhi Capitals)ला विजयासाठी 180 रनचं आव्हान दिलं आहे.

    शारजाह, 17 ऑक्टोबर : फाफ डुप्लेसिसचं अर्धशतक आणि रविंद्र जडेजाच्या फटकेबाजीमुळे चेन्नई (CSK)ने दिल्ली (Delhi Capitals)ला विजयासाठी 180 रनचं आव्हान दिलं आहे. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या चेन्नईची सुरुवात या मॅचमध्येही खराब झाली. ओपनिंगला आलेला सॅम करन शून्य रन करुन आऊट झाला. यानंतर फाफ डुप्लेसिस आणि शेन वॉटसनने चेन्नईचा डाव सावरला. डुप्लेसिसनं 47 बॉलमध्ये 58 रन, तर वॉटसनने 28 बॉलमध्ये 36 रन केले. अंबाती रायुडू 25 बॉलमध्ये 45 रनवर आणि रविंद्र जडेजा 13 बॉलमध्ये 33 रनवर नाबाद राहिले. दिल्लीकडून एनरिच नॉर्कियाला सर्वाधिक 2 विकेट मिळाल्या, तर तुषार देशपांडे आणि कगिसो रबाडाला प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. या मॅचमध्ये चेन्नईने पुन्हा एकदा केदार जाधवला संधी दिली आहे. तर दिल्ली (Delhi Capitals)ने त्यांच्या टीममध्ये कोणताही बदल केलेला नाही. पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नईची टीम सहाव्या तर दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्ले-ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी चेन्नईला या मॅचमध्ये जिंकणं गरजेचं आहे. दुसरीकडे दिल्लीने ही मॅच जिंकली तर ते पॉईंट्स टेबलमध्ये पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर जाऊ शकतात. चेन्नईने यंदाच्या मोसमात 8 पैकी फक्त 3 मॅच जिंकल्या आहेत, तर 5 मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला, तर दिल्लीच्या टीमने यंदा 8 पैकी 6 मॅच जिंकल्या असून फक्त 2 मॅचमध्येच त्यांच्या पदरी निराशा आली. चेन्नईची टीम सॅम करन, फाफ डुप्लेसिस, शेन वॉटसन, अंबाती रायुडू, एमएस धोनी, केदार जाधव, रविंद्र जडेजा, ड्वॅन ब्राव्हो, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, कर्ण शर्मा दिल्लीची टीम पृथ्वी शॉ, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, मार्कस स्टॉयनिस, एलेक्स कॅरी, अक्सर पटेल, आर. अश्विन, तुषार देशपांडे, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्किया
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या