IPL 2020 : मुंबईविरुद्ध 50 रन करताच चेन्नईचा बँगलोरवर निशाणा

IPL 2020 : मुंबईविरुद्ध 50 रन करताच चेन्नईचा बँगलोरवर निशाणा

आयपीएल (IPL 2020)च्या शुक्रवारच्या मॅचमध्ये मुंबई (Mumbai Indians)ने चेन्नई (CSK)चा 10 विकेटने दारुण पराभव केला. पण या मॅचदरम्यान चेन्नईने बँगलोर (RCB)ला ट्रोल केलं.

  • Share this:

शारजाह, 24 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या शुक्रवारच्या मॅचमध्ये मुंबई (Mumbai Indians)ने चेन्नई (CSK)चा 10 विकेटने दारुण पराभव केला. टॉस हरल्यानंतर बॅटिंगला उतरलेल्या चेन्नईची सुरुवात अत्यंत खराब झाली. 3 रनवरच त्यांच्या 4 विकेट गेल्या, यानंतर चेन्नई सावरू शकली नाही. या मॅचमध्ये चेन्नईने एन जगदीसन आणि ऋतुराज गायकवाड या युवा खेळाडूंना संधी दिली, पण दोघंही शून्य रनवर आऊट झाले.

चेन्नईने आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच पावरप्लेमध्ये 5 विकेट गमावल्या. पावरप्ले संपला तेव्हा चेन्नईचा स्कोअर 6 ओव्हरमध्ये 47-7 एवढा होता. पण जसा चेन्नईने 50 रनचा आकडा पार केला, तसं त्यांनी ट्विटरवर विराटच्या बँगलोर (RCB)ला ट्रोल केलं.

बँगलोरने आयपीएल इतिहासातला सगळ्यात कमी स्कोअर केला होता. 2017 साली कोलकाता (KKR)विरुद्धच्या मॅचमध्ये बँगलोरचा 49 रनवर ऑलआऊट झाला होता. ईडन गार्डनच्या मैदानात झालेल्या या मॅचमध्ये कोलकात्याने 134 रन केले होते. या आव्हानाचा पाठलाग करायला आलेली बँगलोर 49 रनवर ऑलआऊट झाली आणि कोलकात्याने ती मॅच 82 रननी जिंकली. चेन्नईने बँगलोरच्या या स्कोअरचा दाखला देत त्यांना ट्रोल केलं. चेन्नईने 50 रन केल्यानंतर 'कमीत कमी 49 रन टाळल्या', असं ट्विट केलं.

ट्रेन्ट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह यांनी सुरुवातीपासून चेन्नईला धक्के दिले. बोल्टने या मॅचमध्ये 4 विकेट घेतल्या, तर बुमराह आणि राहुल चहरला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. नॅथन कुल्टर नाईलला एक विकेट घेण्यात यश आलं. चेन्नईने ठेवलेल्या आव्हानाचा पाठलाग मुंबईने अगदी सहज 12.2 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता केला. इशान किशनने 37 बॉलमध्ये 68 नाबाद रन आणि क्विंटन डिकॉकने 37 बॉलमध्ये नाबाद 46 रन केले. रोहित शर्माला दुखापत झाल्यामुळे कायरन पोलार्डने या मॅचमध्ये मुंबईचं नेतृत्व केलं होतं. या विजयासोबतच मुंबई पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. 10 पैकी 7 मॅचमध्ये मुंबईचा विजय झाला असून 3 मॅच त्यांना गमवाव्या लागल्या आहेत. त्यांच्या खात्यात सध्या 14 पॉईंट्स आहेत.

Published by: Shreyas
First published: October 24, 2020, 5:00 PM IST
Tags:

ताज्या बातम्या