दुबई, 10 ऑक्टोबर : भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag)हा त्याच्या रोखठोक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात चेन्नई (CSK)ची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. यावरुन सेहवागने चेन्नईच्या टीमवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. चेन्नईने आतापर्यंत 6 पैकी 4 मॅचमध्ये पराभव स्वीकारला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नईची टीम सहाव्या क्रमांकावर आहे. चेन्नईचे बॅट्समन आपण सरकारी नोकरी करत आहोत, आणि आपल्याला टीममधून कोणीही काढणार नाही, असं वागत आहेत, अशी टीका सेहवागने केली आहे.
कोलकाता (KKR)विरुद्धची मॅच चेन्नई जिंकेल असं वाटत होतं, पण चेन्नईने हातातली मॅच घालवली. यानंतर केदार जाधववर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागली आहे. केदार जाधवने या मोसमातल्या 6 मॅचमध्ये 19.33 च्या सरासरीने आणि 98.30च्या स्ट्राईक रेटने फक्त 58 रन केल्या आहेत. केदार जाधवला ड्वॅन ब्राव्होच्या आधी बॅटिंगला पाठवण्यावरुन धोनीच्या रणनीतीवरही टीका होत आहे.
हे वाचा-IPL 2020 : छोट्या मैदानात दिल्लीची टिच्चून बॉलिंग, राजस्थानचा आणखी एक पराभव
'चेन्नईचे खेळाडू टीमला सरकारी नोकरी समजत आहेत. कामगिरी चांगली करा अथवा करु नका, पगार तर मिळणारच आहे. या आव्हानाचा पाठलाग होणं गरजेचं होतं. पण केदार जाधव आणि रविंद्र जडेजाने डॉट बॉल खेळले. यामुळे नुकसान झालं,' असं सेहवाग क्रिकबझशी बोलताना म्हणाला.
याचसोबत कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये केदार जाधवलाच मॅन ऑफ द मॅच द्यायला पाहिजे होतं, असा टोलाही सेहवागने त्याचा कार्यक्रम वीरू की बैठक मध्ये लगावला. केदार जाधव बॅटिंगला आला तेव्हा चेन्नईला विजयासाठी 21 बॉलमध्ये 39 रनची गरज होती. जाधवने 12 बॉल खेळून फक्त 7 रन केले.
हे वाचा-IPL 2020 : या टीममध्ये एकत्र दिसणार मुंबईचे तीन दिग्गज खेळाडू?
चेन्नईसाठी यंदाच्या मोसमाची सुरुवातच खराब झाली. युएईमध्ये पोहोचल्यावर टीमचे 12 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह झाले. यानंतर टीमचे वरिष्ठ खेळाडू सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांनी स्पर्धेतून माघार घेतली.
चेन्नईची टीम आतापर्यंत त्यांनी खेळलेल्या सगळ्या आयपीएलच्या प्ले ऑफ मध्ये पोहोचली आहे. दोन मोसमात चेन्नईच्या टीमवर बंदी असल्यामुळे त्यांना तेव्हाच प्ले ऑफ खेळता आलं नव्हतं. चेन्नईचा पुढचा सामना शनिवारी विराट कोहली (Virat Kohli)च्या बैंगलोर (RCB)विरुद्ध होणार आहे.