IPL 2020 : ट्रोल होणाऱ्या केदार जाधवची अशी आहे आयपीएलमधली कामगिरी

IPL 2020 : ट्रोल होणाऱ्या केदार जाधवची अशी आहे आयपीएलमधली कामगिरी

आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात चेन्नई (CSK)चा संघर्ष सुरुच आहे. कोलकाता (KKR)विरुद्धच्या मॅचनंतर केदार जाधव (Kedar Jadhav)वर टीकेचा भडीमार होत आहे.

  • Share this:

अबु धाबी, 8 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात चेन्नई (CSK)चा संघर्ष सुरुच आहे. कोलकाता (KKR)विरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नई विजय मिळवेल असं वाटत असतानाच मधल्या फळीतल्या बॅट्समननी खराब कामगिरी केली. कर्णधार धोनीने 12 बॉलमध्ये 11 रन केले, तर केदार जाधव 12 बॉलमध्ये 7 रन करुन नाबाद राहिला. शेवटच्या काही ओव्हरमध्ये मोठे शॉट्स मारण्याची गरज असताना केदार जाधव आरामात खेळत होता. केदारच्या या कामगिरीमुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.

केदार जाधवची कामगिरी

मोठे शॉट्स मारणारा आणि जलद रन करणारा खेळाडू अशी केदार जाधवची प्रथम श्रेणी क्रिकेटमधली ओळख आहे. पण आयपीएलमध्ये मात्र त्याला चमकदार कामगिरी करता आली नाही. चेन्नईची टीम केदार जाधवला प्रत्येक मोसमासाठी 7 कोटी 80 लाख रुपये देते. केदार जाधवने चेन्नईकडून खेळताना 17 इनिंगमध्ये 20.44च्या सरासरीने 244 रन केले आहेत. केदार जाधवचा स्ट्राईक रेट 100 पेक्षाही कमी आहे. केदारने चेन्नईकडून खेळताना 97.60 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली आहे.

चेन्नईच नाही तर केदार जाधव आयपीएलमध्ये दिल्लीकडूनही खेळला आहे. दिल्लीकडून खेळतानाही त्याला चमकदार कामगिरी करता आली नाही. संपूर्ण आयपीएलमध्ये केदारने 85 मॅचमध्ये 22.74 च्या सरासरीने 1,137 रन केले आहेत. यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश आहे. 24 वेळा नॉट आऊट राहणाऱ्या जाधवची सरासरी 23 एवढी आहे.

केदार जाधवने 2011 साली 6 इनिंगमध्ये 6 च्या सरासरीने 18 रन केले होते, तर त्याचा स्ट्राईक रेट फक्त 78.26 होता. 2019 सालीही केदारने 18 ची सरासरी आणि 95.85 च्या स्ट्राईक रेटने रन केले. आकडेवारी बघितली तर केदार जाधवला आयपीएलमध्ये यश मिळालं नसलं, तरी धोनाचा विश्वास त्याच्यावर कायम आहे.

Published by: Shreyas
First published: October 8, 2020, 5:08 PM IST
Tags:

ताज्या बातम्या