IPL 2020 : ऋतुराज गायकवाडचं नाबाद अर्धशतक, चेन्नई अखेर विजयाच्या मार्गावर

IPL 2020 : ऋतुराज गायकवाडचं नाबाद अर्धशतक, चेन्नई अखेर विजयाच्या मार्गावर

ऋतुराज गायकवाडच्या नाबाद अर्धशतकामुळे चेन्नई (CSK) अखेर विजयाच्या मार्गावर आली आहे. बँगलोर (RCB)ने दिलेलं 146 रनचं आव्हान चेन्नईने 18.4 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून पूर्ण केलं.

  • Share this:

दुबई, 25 ऑक्टोबर : ऋतुराज गायकवाडच्या नाबाद अर्धशतकामुळे चेन्नई (CSK) अखेर विजयाच्या मार्गावर आली आहे. बँगलोर (RCB)ने दिलेलं 146 रनचं आव्हान चेन्नईने 18.4 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून पूर्ण केलं. ऋतुराज गायकवाड 51 बॉलमध्ये 65 रनवर आणि एमएस धोनी 21 बॉलमध्ये 19 रनवर नाबाद राहिला. बँगलोरकडून सिराज आणि चहलला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

या मॅचमध्ये बँगलोरचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण बँगलोरच्या बलाढ्य बॅटिंगला चेन्नईच्या बॉलरनी 145 रनवर रोखलं. चेन्नईकडून सॅम करनने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर दीपक चहरला 2 आणि मिचेल सॅन्टनरला 1 विकेट मिळाली. बँगलोरकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक 50 रनची खेळी केली, तर एबी डिव्हिलियर्स 39 रनवर आऊट झाला.

बँगलोरविरुद्धच्या या विजयासोबतच चेन्नई आठव्या क्रमांकावरून सातव्या क्रमांकावर आली आहे. चेन्नईने 12 पैकी 4 मॅच जिंकल्या असून 8 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. या मॅचमध्ये त्यांचा विजय झाला असला तरी त्यांच्या प्ले-ऑफला पोहोचण्याच्या शक्यता अत्यंत धूसर आहेत. दुसरीकडे बँगलोरची टीम पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. बँगलोरने 11 पैकी 7 मॅच जिंकल्या असून 4 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे.

Published by: Shreyas
First published: October 25, 2020, 6:55 PM IST
Tags:

ताज्या बातम्या