Home /News /sport /

IPL 2020 : प्ले-ऑफचा रोमांच आणखी वाढला, चेन्नईचा कोलकात्यावर थरारक विजय

IPL 2020 : प्ले-ऑफचा रोमांच आणखी वाढला, चेन्नईचा कोलकात्यावर थरारक विजय

IPL 2020 रविंद्ग जडेजा (Ravindra Jadeja) च्या अफलातून फटकेबाजीमुळे चेन्नई (CSK) ने कोलकाता (KKR) वर रोमहर्षक विजय मिळवला आहे.

    दुबई, 29 ऑक्टोबर : रविंद्ग जडेजा (Ravindra Jadeja) च्या अफलातून फटकेबाजीमुळे चेन्नई (CSK) ने कोलकाता (KKR) वर रोमहर्षक विजय मिळवला आहे. शेवटच्या ओव्हरला चेन्नईला विजयासाठी 10 रनची गरज होती. तेव्हा कमलेश नागरकोटीने पहिल्या 4 बॉलमध्ये पक्त 3 रनच दिले, यानंतर उरलेल्या 2 बॉलवर चेन्नईला 7 रन हवे होते. जडेजाने या दोन्ही बॉलवर सिक्स मारून चेन्नईला विजय मिळवून दिला. कोलकात्याने ठेवलेल्या 173 रनच्या आव्हानाचा पाठलाग चेन्नईला जमणार नाही, असं वाटत होतं, पण 19 व्या ओव्हरमध्ये लॉकी फर्ग्युसनने टाकलेल्या नो बॉलनंतर चेन्नईने मागे वळून पाहिलं नाही. फर्ग्युसनने 19व्या ओव्हरचा पाचवा बॉल नो बॉल टाकला, या बॉलला जडेजाने 2 रन काढले आणि पुन्हा स्ट्राईक घेतला. पुढच्या फ्री हीटला जडेजाने सिक्स मारली, तर फर्ग्युसनच्या शेवटच्या बॉलवर जडेजाने पुन्हा फोर मारली. जडेजाने या मॅचमध्ये 11 बॉलमध्ये नाबाद 31 रन केले, तर ऋतुराज गायकवाडने 53 बॉलमध्ये 72 रनची खेळी केली. अंबाती रायुडूनेही 20 बॉलमध्ये 38 रन केले. तर सॅम करनने 13 रनवर नाबाद राहून जडेजाला साथ दिली. कोलकात्याकडून वरुण चक्रवर्ती आणि पॅट कमिन्सला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. या मॅचमध्ये चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि कोलकात्याला 172 रनवर रोखलं. नितीश राणाने 61 बॉलमध्ये 87 रन केले, तर शुभमन गिलने 26 रन आणि दिनेश कार्तिकने नाबाद 21 रनची खेळी केली. चेन्नईकडून लुंगी एनगिडीने 2 विकेट घेतल्या, तर सॅन्टनर, जडेजा आणि कर्ण शर्मा यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. चेन्नईविरुद्धच्या या पराभवानंतर कोलकात्याचं प्ले-ऑफला पोहोचण्याचं स्वप्न आता आणखी कठीण झालं आहे, तर स्पर्धेची चुरस आणखी वाढली आहे. प्ले-ऑफला पोहोचण्यासाठी आता कोलकात्याला पुढची मॅच जिंकावीच लागणार आहे, सोबतच इतर टीमच्या कामगिरीवरही त्यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. पॉईंट्स टेबलमध्ये कोलकात्याची टीम पाचव्या क्रमांकावर आहे. त्यांनी 13 पैकी 6 मॅच जिंकल्या असून 7 मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. तर दुसरीकडे चेन्नईची टीम शेवटच्या क्रमांकावर कायम आहे. चेन्नईने 13 पैकी 5 मॅच जिंकल्या तर 8 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या