मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020 : 'सुंदर तर एबीपेक्षा चांगला बॅट्समन', या खेळाडूचा विराटच्या रणनीतीवर निशाणा

IPL 2020 : 'सुंदर तर एबीपेक्षा चांगला बॅट्समन', या खेळाडूचा विराटच्या रणनीतीवर निशाणा

आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात विराट कोहलीची बँगलोर (RCB)जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. पण बँगलोरने पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये वापरलेल्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या मॅचमध्ये विराट कोहली (Virat Kohli) ने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas
शारजाह, 15 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात विराट कोहलीची बँगलोर (RCB)जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. पण बँगलोरने पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये वापरलेल्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या मॅचमध्ये विराट कोहली (Virat Kohli) ने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर बँगलोरला सुरुवातीला दोन धक्के लागले. शारजाहचं छोटं मैदान आणि त्यात लवकर गेलेल्या विकेट बघता एबी डिव्हिलियर्स (AB Devillers) ने बॅटिंगला येणं अपेक्षित होतं. एबी डिव्हिलियर्सचा सध्याचा शानदार फॉर्म बघता तोच चौथ्या क्रमांकावर येईल असं वाटत होतं, पण बँगलोरने वॉशिंग्टन सुंदरला बॅटिंगला पाठवलं. बँगलोरची टीम एवढ्यावरच थांबली नाही, तर त्यांनी पाचव्या क्रमांकावरही शिवम दुबेला पाठवलं. अखेर सहाव्या क्रमांकावर एबी डिव्हिलियर्सची वर्णी लागली. बँगलोरच्या या रणनीतीवर आशिष नेहरा (Ashish Nehra) याने निशाणा साधला आहे. वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) एबी डिव्हिलियर्सपेक्षा चांगला बॅट्समन आहे, असा टोला नेहराने लगावला. हिंदीमध्ये कॉमेंट्री करताना आशिष नेहरा बोलत होता. आज जगाने एबी डिव्हिलियर्सपेक्षा चांगला बॅट्समन बघितला आणि तो आहे वॉशिंग्टन सुंदर, असं नेहरा कॉमेंट्री करताना म्हणाला. बँगलोरने त्यांचा सर्वोत्तम बॅट्समन एबी डिव्हिलियर्सला सर्वाधिक बॉल खेळण्याची संधी दिली पाहिजे, पण त्याला मागे पाठवण्याचा निर्णय हैराण करणारा आहे, अशी प्रतिक्रिया नेहराने दिली. नेहरा हा बँगलोरचा माजी बॉलिंग प्रशिक्षकही होता. डिव्हिलियर्स बॅटिंगला येण्याआधी सुंदरने 14 बॉलमध्ये 23 आणि शिवम दुबे (Shivam Dube)ने 19 बॉलमध्ये 23 रन केले. यानंतर बॅटिंगला आलेला एबी डिव्हिलियर्स फक्त 5 बॉलमध्ये 2 रन करुन आऊट झाला.
First published:

पुढील बातम्या