Home /News /sport /

IPL 2020 : 36 वर्षांच्या डुप्लेसिसची चपळता, सीमारेषेवर घेतला भन्नाट कॅच, पाहा VIDEO

IPL 2020 : 36 वर्षांच्या डुप्लेसिसची चपळता, सीमारेषेवर घेतला भन्नाट कॅच, पाहा VIDEO

चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Superkings)च्या फाफ डुप्लेसिस (Faf Du Plessis)ने आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमात जबरदस्त फिल्डिंग केली आहे.

    दुबई, 3  ऑक्टोबर : क्रिकेटमध्ये वयाला नेहमीच महत्त्व दिलं जातं. तरुण खेळाडू मैदानामध्ये सर्वोत्तम फिल्डिंग करता असं सांगितलं आहे. पण चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Superkings)च्या फाफ डुप्लेसिस (Faf Du Plessis)ने आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमात जबरदस्त फिल्डिंग केली आहे. डुप्लेसिस जरी 36 वर्षांचा असला तरी या आयपीएलमध्ये तो एखाद्या 20 वर्षांच्या तरुणाला लाजवेल अशी फिल्डिंग करत आहे. आयपीएलच्या या हंगामात फाफ डुप्लेसिस सर्वाधिक कॅच पकडणारा खेळाडू बनला आहे. हैदराबाद (Sunrisers Hyderabad)विरुद्धच्या मॅचमध्ये डुप्लेसिसने डेव्हिड वॉर्नरचा भन्नाट कॅच पकडला. हा कॅच पकडत असताना डुप्लेसिसचं नियंत्रणही सुटत होतं, पण त्याने सीमारेषेला स्पर्श करण्याआधीच बॉल हवेत उडवला. सीमारेषेच्या पार गेल्यानंतर डुप्लेसिस पुन्हा मैदानात आला आणि त्याने अफलातून कॅच पकडला. फाफ डुप्लेसिसने आयपीएल 2020 मध्ये एकूण 5 कॅच पकडले आहेत. डुप्लेसिसनंतर ऋषभ पंत, संजू सॅमसन आणि एमएस धोनी यांनी 4-4 कॅच पकडले आहेत. महत्त्वाचं म्हणजे धोनी आणि पंत विकेट कीपर आहेत, पण त्यांच्यापेक्षा जास्त कॅच डुप्लेसिसच्या नावावर आहेत. हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये 11वी ओव्हर सुरु असताना पियुष चावलाच्या बॉलिंगवर डेव्हिड वॉर्नरे सिक्स मारण्याचा प्रयत्न केला. वॉर्नरने मारलेला शॉट लॉन्ग ऑनवरच्या सीमारेषेबाहेर जाईल, असं वाटत असतानाच तिकडे डुप्लेसिस आला आणि त्याने उडी मारून कॅच पकडला. डुप्लेसिसच नाही, तर चेन्नईच्या संपूर्ण टीमने या स्पर्धेत फक्त 1 कॅच सोडला आहे. दुसरीकडे फिटनेससाठी आग्रही असलेल्या विराट कोहलीच्या आरसीबीने 10 कॅच सोडले आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या