IPL 2020 : सुरेश रैना, हरभजन सिंगला CSK आणखी एक धक्का द्यायच्या तयारीत

IPL 2020 : सुरेश रैना, हरभजन सिंगला CSK आणखी एक धक्का द्यायच्या तयारीत

यंदाच्या आयपीएल (IPL 2020) मध्ये चेन्नई (Chennai Superkings)च्या टीमला संघर्ष करावा लागत आहे. सुरेश रैना (Suresh Raina) आणि हरभजन सिंग) हे दोन दिग्गज खेळाडू नसल्यामुळे चेन्नईच्या टीममध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

  • Share this:

दुबई, 2 ऑक्टोबर : यंदाच्या आयपीएल (IPL 2020) मध्ये चेन्नई (Chennai Superkings)च्या टीमला संघर्ष करावा लागत आहे. आतापर्यंत खेळलेल्या 3 मॅचपैकी 2 मॅचमध्ये चेन्नईचा पराभव झाला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नई शेवटच्या क्रमांकावर आहे. सुरेश रैना (Suresh Raina) आणि हरभजन सिंग) हे दोन दिग्गज खेळाडू नसल्यामुळे चेन्नईच्या टीममध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याचं चित्र आहे. त्यातच आता चेन्नईची टीम या दोन्ही खेळाडूंवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार चेन्नई सुपरकिंग्ज या दोन्ही खेळाडूंचा करार संपवण्याच्या तयारीत आहे. याआधीच रैना आणि हरभजनला चेन्नई टीमच्या वेबसाईटवरच्या टीममधून हटवण्यात आलं होतं. या दोन्ही खेळाडूंनी वैयक्तिक कारणांमुळे यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतली.

स्पोर्ट्स वेबसाईट इनसाईड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार चेन्नई सुपरकिंग्जने या दोन्ही खेळाडूंना टीममधून हटवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. सुरेश रैनाचं पुनरागमन आता कठीण आहे, असं काहीच दिवसांपूर्वी चेन्नई सुपरकिंग्जचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी सांगितलं होतं. टीम सध्या रैनाच्या पुनरागमनाबाबत विचार करत नाही. रैना स्वत: परत गेला होता, त्यामुळे टीम त्याच्या निर्णयाचा सन्मान करते, असं काशी विश्वनाथन म्हणाले होते. यानंतर रैनाने ट्विटरवरुन चेन्नई सुपरकिंग्जला ट्विटरवरुन अनफॉलो केलं होतं.

किती रुपयांचं कॉन्ट्रॅक्ट?

चेन्नई सुपरकिंग्ज रैनाला यंदाच्या मोसमासाठी 11 कोटी रुपये आणि हरभजनला 2 कोटी रुपये देणार होती. पण दोघांनीही या मोसमातून माघार घेतल्यामुळे त्यांना एकही पैसा मिळणार नाही. चेन्नईच्या टीमने रैनाला 11 कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं होतं. तर 2018 सालच्या लिलावामध्ये हरभजनला 2 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं.

पुढच्या वर्षी काय होणार?

कोरोना व्हायरसमुळे यंदाच्या वर्षीची आयपीएल मार्चच्या ऐवजी सप्टेंबर महिन्यात सुरु झाली. तसंच पुढच्या वर्षी होणारी स्पर्धा वेळेत सुरु होणार आहे, त्यामुळे 2021च्या मोसमासाठी होणारा लिलाव एक वर्ष पुढे ढकलण्यात आला आहे. अशात सगळ्या टीमना आहे त्या खेळाडूंसोबतच खेळावं लागणार आहे. त्यामुळे रैना आणि हरभजनला पुढच्या मोसमात एखादी टीम बाहेरुनच विकत घेऊ शकते. रैनाचं सध्याचं वय 33 वर्ष आहे, त्यामुळे त्याला टीममध्ये घेण्यासाठी एखादी टीम रस दाखवू शकते. हरभजन मात्र 40 वर्षांचा झाला आहे, त्यामुळे आता त्याचं आयपीएलमध्ये खेळणं कठीण होऊन बसलं आहे.

टीम मालक रैनावर नाराज

यंदाची आयपीएल सुरु होण्याआधी वैयक्तिक कारणांमुळे रैना भारतात परत आला होता. तर हरभजन सिंगने युएईमध्ये जायला नकार दिला होता. यानंतर चेन्नई सुपरकिंग्जचे मालक एन.श्रीनिवासन यांनी रैनाच्या निर्णयावर उघड नाराजी जाहीर केली होती. रैना हॉटेलमध्ये मिळालेल्या रुमवरुन नाराज झाला आणि भारतात परतल्याचं सांगितलं जातं. यानंतर यशाची हवा रैनाच्या डोक्यात गेल्याची टीका श्रीनिवासन यांनी केली होती.

Published by: Shreyas
First published: October 2, 2020, 3:28 PM IST
Tags:

ताज्या बातम्या