IPL 2020 : चेन्नईची हाराकिरी सुरूच, धोनीची टीम आता हैदराबादकडून पराभूत

IPL 2020 : चेन्नईची हाराकिरी सुरूच, धोनीची टीम आता हैदराबादकडून पराभूत

आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमात चेन्नई (Chennai Superkings)ची हाराकिरी सुरूच आहे. हैदराबाद (Sunrisers Hyderabad)विरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नईचा पराभव झाला आहे.

  • Share this:

दुबई, 2 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमात चेन्नई (Chennai Superkings)ची हाराकिरी सुरूच आहे. हैदराबाद (Sunrisers Hyderabad)विरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नईचा 7 रननी पराभव झाला आहे. यंदाच्या मोसमात चेन्नईने 4 पैकी 3 मॅच गमावल्या आहेत, तर मुंबई (Mumbai Indians)विरुद्धची एकमेव मॅच त्यांना जिंकता आली होती. पॉईंट्स टेबलमध्येही चेन्नईची टीम खालच्या म्हणजेच 8व्या क्रमांकावर आहे.

हैदराबादने ठेवलेल्या 165 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 157/5 पर्यंतच मजल मारता आली. सहाव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या रविंद्र जडेजाने 35 बॉलमध्ये सर्वाधिक 50 रन केले. तर धोनी 47 रनवर नाबाद राहिला. चेन्नईचा ओपनर शेन वॉटसन या मॅचमध्येही अपयशी ठरला. भुवनेश्वर कुमारने त्याला 1 रनवर बोल्ड केलं. पुनरागमन करणाऱ्या अंबाती रायुडूलाही चमक दाखवता आली नाही. तो 8 रनवर आऊट झाला. हैदराबादकडून नटराजनने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार आणि अब्दुल समदला प्रत्येकी 1 विकेट घेण्यात यश आलं.

या मॅचमध्ये हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण त्यांची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ओपनर जॉनी बेयरस्टो शून्य रनवर आऊट झाला. यानंतर वॉर्नर आणि मनिष पांडेने हैदराबादचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आलं नाही. वॉर्नर 28 रनवर आणि मनिष पांडे 29 रनवर आऊट झाला. चौथ्या क्रमांकावर आलेल्या केन विलियमसनलाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. हैदराबादची स्थिती 69/4 अशी झाली होती. पण प्रियम गर्ग आणि अभिषेक शर्मा या नवोदित खेळाडूंनी हैदराबादला 164 रनपर्यंत पोहोचवलं. प्रियम गर्गने 26 बॉलमध्ये नाबाद 51 रन केले आणि अभिषेक शर्मा 31 रन करून आऊट झाला.

चेन्नईकडून दीपक चहरला 2 विकेट मिळाल्या तर शार्दुल ठाकूर आणि पियुष चावलाला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

Published by: Shreyas
First published: October 2, 2020, 11:37 PM IST
Tags:

ताज्या बातम्या