IPL 2020 : चेन्नईचं दणक्यात कमबॅक, एकही विकेट न गमावता पंजाबला लोळवलं

IPL 2020 : चेन्नईचं दणक्यात कमबॅक, एकही विकेट न गमावता पंजाबला लोळवलं

आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात चेन्नई (Chennai Super Kings) ने दणक्यात पुनरागमन केलं आहे.

  • Share this:

अबु धाबी : आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात चेन्नई (Chennai Super Kings) ने दणक्यात पुनरागमन केलं आहे. लागोपाठ 3 मॅच गमावल्यानंतर चेन्नईने पंजाब (Kings XI Punjab)चा एकही विकेट न गमावता पराभव केला आहे. पंजाबने ठेवलेल्या 179 रनचं आव्हान चेन्नईने 17.4 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. शेन वॉटसन (Shane Watson)ने 53 नाबाद 83 रन केले, तर डुप्लेसिस (Faf Du Plessis)ही 53 बॉलमध्ये 87 रनवर नाबाद राहिला.

या मॅचमध्ये पंजाबचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul)ने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. राहुलनेच पंजाबकडून 52 बॉलमध्ये 63 रनची खेळी केली. तर निकोलास पूरनने जलद 33 रन केले. मयंक अग्रवाल 26 रन आणि मनदीप सिंगही 27 रन करुन आऊट झाले. चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या, तर जडेजा आणि पियुष चावलाला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

मुंबईविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये विजय झाल्यानंतर चेन्नईला लागोपाठ 3 मॅच गमवाव्या लागल्या. आता 5 पैकी 2 मॅचमध्ये चेन्नईचा विजय झाला आहे, तर पंजाबने 5 पैकी 4 मॅच गमावल्या आहेत, आणि एकाच मॅचमध्ये त्यांना विजय मिळाला आहे. पॉईंट्स टेबलमध्येही पंजाबची टीम शेवटच्या क्रमांकावर गेली आहे. तर चेन्नईची टीम आठव्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर आली आहे.

Published by: Shreyas
First published: October 4, 2020, 11:17 PM IST
Tags:

ताज्या बातम्या