IPL 2020 : विजयाच्या ट्रॅकवर येण्यासाठी राहुल-धोनी मैदानात, पंजाबची बॅटिंग

IPL 2020 : विजयाच्या ट्रॅकवर येण्यासाठी राहुल-धोनी मैदानात, पंजाबची बॅटिंग

आयपीएल (IPL 2020)मध्ये विजयाच्या ट्रॅकवर पुन्हा येण्यासाठी चेन्नई (Chennai Superkings)आणि पंजाब (Kings XI Punjab)च्या टीम मैदानात उतरल्या आहेत.

  • Share this:

दुबई : आयपीएल (IPL 2020)मध्ये विजयाच्या ट्रॅकवर पुन्हा येण्यासाठी चेन्नई (Chennai Superkings)आणि पंजाब (Kings XI Punjab)च्या टीम मैदानात उतरल्या आहेत. या मॅचमध्ये पंजाबचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul)याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. धोनीने या मॅचसाठी त्याच्या टीममध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत, तर राहुलने तीन खेळाडू बदलले आहेत. पंजाबने करुण नायर, कृष्णप्पा गौतम आणि जेम्स नीशमच्याऐवजी मनदीप सिंग, हरप्रीत ब्रार आणि क्रिस जॉर्डनला संधी दिली आहे.

पॉईंट्स टेबलमध्ये पंजाब आणि चेन्नईच्या टीम तळाला आहेत. या दोन्ही टीमनी त्यांचे 4 पैकी 3 सामने गमावले आहेत, तर दोघांचा एकाच सामन्यात विजय झाला आहे. चांगल्या नेट रनरेटमुळे पंजाब सातव्या तर चेन्नई आठव्या क्रमांकावर आहे.

चेन्नईची टीम

शेन वॉटसन, अंबाती रायुडू, फाफ डुप्लेसिस, एमएस धोनी, केदार जाधव, रविंद्र जडेजा, ड्वॅन ब्राव्हो, सॅम करन, शार्दुल ठाकूर, पियुष चावला, दीपक चहर

पंजाबची टीम

केएल राहुल, मयंक अग्रवाल, मनदीप सिंग, निकोलास पूरन, ग्लेन मॅक्सवेल, सरफराज खान, क्रिस जॉर्डन, हरप्रीत ब्रार, रवी बिष्णोई, मोहम्मद शमी, शेल्डन कॉट्रेल

Published by: Shreyas
First published: October 4, 2020, 7:48 PM IST
Tags:

ताज्या बातम्या