मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020 : फॉर्ममध्ये आलेला विराट म्हणतो, 'बुमराहच्या त्या ओव्हरने विचारच बदलला'

IPL 2020 : फॉर्ममध्ये आलेला विराट म्हणतो, 'बुमराहच्या त्या ओव्हरने विचारच बदलला'

IPL 2020 रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli)हा पुन्हा एकदा फॉर्ममध्ये परतला आहे. सुरुवातीच्या काही मॅचमध्ये अपयशी ठरल्यानंतर आता विराट पुन्हा एकदा खोऱ्याने रन काढत आहे.

  • Published by:  Shreyas

दुबई, 11 ऑक्टोबर : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli)हा पुन्हा एकदा फॉर्ममध्ये परतला आहे. सुरुवातीच्या काही मॅचमध्ये अपयशी ठरल्यानंतर आता विराट पुन्हा एकदा खोऱ्याने रन काढत आहे. शनिवारी धोनीच्या चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्ये कोहलीने 90 रनची खेळी केली. त्याआधी विराटने राजस्थानविरुद्ध 72 रन आणि दिल्लीविरुद्ध 43 रन केले. फॉर्ममध्ये परत येण्यासाठी बुमराहची एक ओव्हर कामाला आली, असं विराट कोहली म्हणाला आहे. बुमराहच्या एका ओव्हरमुळे माझा विचारच बदलून गेला, अशी प्रतिक्रिया विराटने दिली.

'मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सुपर ओव्हरमध्ये बुमराहला खेळलेल्या पूल शॉटमुळे माझा विचार बदलला. मुंबईविरुद्धच्या सुपर ओव्हरच्या मॅचआधी मी खूप जास्त गोष्टी करण्याचा प्रयत्न करत होतो. स्वत:वरच दबाव घेत होतो. यामुळे माझं लक्ष्य हटत होतं. अनेकवेळा बॅटिंग करताना आपण खेळाडू आहेत हे विसरून जातो. जबाबदारीबद्दल आपण जास्तच विचार करतो. त्यामुळे तुम्ही दबावात येता आणि खेळाडूसारखं खेळत नाही. बुमराहविरुद्धच्या सुपर ओव्हरमध्ये मला प्रत्येक बॉलला शॉट मारायचा होता, अन्यथा आम्ही मॅच हरलो असतो. तिकडेच माझा विचार बदलला आणि यानंतर मी बॅटिंग आणि ट्रेनिंगची जास्त मजा घ्यायला लागलो,' असं विराटने सांगितलं.

28 सप्टेंबरला झालेल्या या मॅचमध्ये बँगलोरने मुंबईला विजयासाठी 202 रनचं आव्हान दिलं होतं. शेवटच्या ओव्हरमध्ये मुंबईला 19 रनची गरज होती, पण त्यांना 18 रनच करता आले. शेवटच्या बॉलला फोर मारल्यामुळे मॅच टाय झाली. सुपर ओव्हरमध्ये विराटच्या टीमला विजयासाठी 7 रनची गरज होती. त्यावेळी एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली मैदानात उतरले. या दोघांनी बुमराहच्या बॉलिंगवर रन काढून टीमला जिंकवून दिलं.

आयपीएलच्या पहिल्या 3 मॅचमध्ये विराटचा स्कोअर 14, 1 आणि 3 होता. पण पुढच्या तीन इनिंगमध्ये विराटने 72 नाबाद, 43 आणि 90 नाबाद रन केले. विराटने या मोसमात 6 मॅचमध्ये 55.75 च्या सरासरीने 223 रन केले आहेत. 6 मॅचमध्ये 4 विजय मिळवलेली विराटची टीम पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.

First published: