मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020 : ब्रायन लारा म्हणतो, 'ही आहे आयपीएलची सर्वोत्तम टीम'

IPL 2020 : ब्रायन लारा म्हणतो, 'ही आहे आयपीएलची सर्वोत्तम टीम'

वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटपटू ब्रायन लारा (Brian Lara)याने आयपीएल (IPL 2020) मधली नंबर 1 टीम सांगितली आहे. लाराने याबाबतचं कारणही विचारलं आहे.

  • Published by:  Shreyas
मुंबई, 18 ऑक्टोबर : वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटपटू ब्रायन लारा (Brian Lara)याने आयपीएल (IPL 2020) मधली नंबर 1 टीम सांगितली आहे. लाराने याबाबतचं कारणही विचारलं आहे. आयपीएलच्या 13व्या मोसमात कोलकात्याचा पराभव केल्यानंतर मुंबईची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली. मुंबई आणि दिल्ली (Delhi Capitals) चे पॉईंट्स सारखे असले, तरी मुंबई (Mumbai Indians) चा नेट रनरेट चांगला असल्यामुळे त्यांना पहिला क्रमांक मिळाला आहे. ब्रायन लारादेखील यंदाच्या वर्षातल्या मुंबईच्या कामगिरीमुळे प्रभावित झाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळत असलेली मुंबई (Mumbai Indians)सर्वोत्तम टीम असल्याचं लारा म्हणाला. 'चार वेळा आयपीएल जिंकलेल्या मुंबईला दिल्लीपेक्षा जास्त फायदा आहे, कारण अनुभव त्यांच्या पाठीशी आहे,' असं लारा स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला. मुंबईने शुक्रवारी कोलकाता (KKR)चा 8 विकेटने पराभव केला. लागोपाठ 5 मॅच जिंकल्यानंतर मुंबईचे 8 मॅचमध्ये 12 पॉईंट्स आहेत. या मॅचमध्ये रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉक यांच्यात 94 रनची ओपनिंग पार्टनरशीप झाली. 19 बॉल बाकी असतानाच मुंबईने 8 विकेटने ही मॅच खिशात टाकली. 'येणाऱ्या मॅचमध्येही अशीच कामगिरी करणं गरजेचं आहे, पण या कामगिरीमुळे संतुष्ट होता कामा नये', असं रोहित शर्मा मॅचनंतर म्हणाला. 'टीम कशाप्रकारे मॅच हरतात ते आपण बघितलं आहे, त्यामुळे आम्ही विजयासाठी भुकेले असणं गरजेचं आहे. खेळाडू मागच्या 6 महिन्यांमध्ये क्रिकेट खेळले नव्हते', अशी प्रतिक्रिया रोहितने दिली.
First published:

पुढील बातम्या