Home /News /sport /

IPL 2020 : लाराला आवडले आयपीएलमधले हे 6 भारतीय खेळाडू

IPL 2020 : लाराला आवडले आयपीएलमधले हे 6 भारतीय खेळाडू

वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटपटू ब्रायन लारा (Brian Lara)याने आयपीएल (IPL 2020) च्या या वर्षातल्या सर्वोत्तम अशा 6 खेळाडूंची निवड केली आहे.

    मुंबई, 9 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) यंदाच्या मोसमातली फायनल आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. मंगळवारी मुंबई (Mumbai Indians)आणि दिल्ली (Delhi Capitals)यांच्यात फायनल मॅच रंगणार आहे. मुंबईने आतापर्यंत सर्वाधिक 4 वेळा आयपीएल जिंकली आहे. रोहितच्या टीमची ही सहावी आयपीएल फायनल असेल. तर दुसरीकडे दिल्लीची टीम पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहोचली आहे. यंदाच्या आयपीएलमध्येही अनेक युवा खेळाडूंनी त्यांची प्रतिभा दाखवून दिली. वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटपटू ब्रायन लारा (Brian Lara)याने या वर्षातल्या सर्वोत्तम अशा 6 खेळाडूंची निवड केली आहे. संजू सॅमसन लाराच्या यादीत राजस्थानचा संजू सॅमसन पहिल्या क्रमांकावर आहे. पहिल्या दोन मॅचमध्ये सॅमसनने तब्बल 16 सिक्स मारले, पण या मोसमात त्याला सातत्य दाखवता आलं नाही. तरीही लाराने त्याचं नाव घेतलं आहे. संजू सॅमसनची बॅटिंग मला आवडते, त्याचाकडे प्रतिभा आहे, तसंच त्याचं टायमिंगही अद्भूत आहे. तो एक अविश्वसनीय खेळाडू आहे, असं लारा म्हणाला. सूर्यकुमार यादव मुंबईचा सूर्यकुमार यादव या मोसमात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. यादवने या मोसमात 15 मॅचमध्ये 41.90 च्या सरासरीने 461 रन केले आहेत, यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट 148.23 एवढा आहे. 'सूर्यकुमार यादव मला आवडत्या खेळाडूंपैकी एक आहे. जर तुमचा सर्वोत्तम खेळाडू ओपनिंगला येत नसेल, तर त्याने निदान तिसऱ्या क्रमांकावर तरी यावं. लवकर विकेट गेली तर सूर्यकुमार यादव भरपाई करतो,' अशी प्रतिक्रिया लाराने दिली. देवदत्त पडिक्कल बँगलोरकडून या मोसमात सर्वाधिक रन करणारा देवदत्त पडिक्कलही लाराला आवडला आहे. 'देवदत्त पडिक्कलमध्ये खूप क्षमता आहे. पण त्याने स्वत:ला थोडं बदललं पाहिजे. एखाद्या खेळाडूची समिक्षा करताना त्याने फक्त टी-20 शॉटच नाही तर टेस्ट शॉटही खेळावे. पडिक्कलला त्याच्या तंत्रावर काम करावं लागणार आहे. तेव्हाच तो टेस्ट क्रिकेट खेळू शकेल. जेव्हा तीन स्लिप आणि एक गली असते, तेव्हा तुम्ही हुक शॉट मारू शकत नाही,' असं वक्तव्य लाराने केलं. केएल राहुल पंजाबचा कर्णधार केएल राहुल याच्याकडे सध्या सर्वाधिक रन केल्याबद्दल ऑरेंज कॅप आहे. राहुलने स्वत:ला आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध केलं आहे. तो नक्कीच उत्कृष्ट खेळाडू असल्याचं मत लाराने मांडलं प्रियम गर्ग भारताच्या अंडर-19 टीमचा कर्णधार प्रियम गर्ग यंदा हैदराबादकडून खेळला. प्रियम गर्गकडेही खूप क्षमता असल्याचं लाराला वाटतं. अब्दुल समद जम्मू काश्मरीचा ऑलराऊंडर अब्दुल समदकडेही प्रतिभा असल्याचं लारा म्हणाला. अब्दुल समद या मोसमात हैदराबादकडून खेळला.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या