Home /News /sport /

IPL 2020 : चेन्नईचा पाय आणखी खोलात, दिग्गज खेळाडू आयपीएलमधून बाहेर

IPL 2020 : चेन्नईचा पाय आणखी खोलात, दिग्गज खेळाडू आयपीएलमधून बाहेर

यंदाच्या आयपीएल (IPL 2020) मध्ये चेन्नई (CSK) च्या टीमसमोरची संकटं काही केल्या संपताना दिसत नाहीत. टीमचा दिग्गज ऑलराऊंडर ड्वॅन ब्राव्हो (Dwayne Bravo)दुखापतीमुळे उरलेली आयपीएल खेळू शकणार नाही.

    दुबई, 21 ऑक्टोबर : यंदाच्या आयपीएल (IPL 2020) मध्ये चेन्नई (CSK) च्या टीमसमोरची संकटं काही केल्या संपताना दिसत नाहीत. टीमचा दिग्गज ऑलराऊंडर ड्वॅन ब्राव्हो (Dwayne Bravo)दुखापतीमुळे उरलेली आयपीएल खेळू शकणार नाही. मांडीला दुखापत झाल्यामुळे ब्राव्हो युएईवरुन लवकरच निघणार आहे. 17 ऑक्टोबरला दिल्लीविरुद्धच्या मॅचवेळी ब्राव्होला दुखापत झाली होती. 'मांडीच्या दुखापतीमुळे ब्राव्हो उरलेली आयपीएल खेळू शकणार नाही. गुरुवारी तो युएईवरुन निघेल. त्याच्या बदली कोणत्या खेळाडूला घ्यायचं का नाही, याबाबत टीम प्रशासन ठरवेल,' असं चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी क्रिकबझशी बोलताना सांगितलं. ब्राव्होने दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये 3 ओव्हर टाकल्या, पण दुखापतीमुळे त्याला चौथी ओव्हर टाकता आली नाही. त्यामुळे धोनीने जडेजाला शेवटची ओव्हर दिली. दिल्लीला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 17 रनची गरज असताना अक्सर पटेलने दिल्लीला जिंकवून दिलं. यंदाच्या आयपीएलमध्ये सुरुवातीपासूनच चेन्नईच्या टीमला धक्के बसत आहेत. दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड यांच्या कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्या होत्या. तर टीमटा दिग्गज खेळाडू सुरेश रैना याने युएईमध्ये पोहोचल्यावर स्पर्धेतून माघार घेतली आणि तो भारतात परत आला. तर हरभजन सिंगनेही या मोसमात तो खेळणार नसल्याचं सांगितलं. ड्वॅन ब्राव्होला यंदाच्या वर्षी सुरुवातीच्या काही मॅचही गुडघ्याच्या दुखापतीमुळे खेळता आल्या नव्हत्या. या मोसमात ब्राव्होने 6 मॅचमध्ये 30 ची सरासरी आणि 8.57 च्या इकोनॉमी रेटने 6 विकेट घेतल्या. तसंच त्याला फक्त 2 वेळा बॅटिंग मिळाली, तेव्हा त्याने 7 रन केल्या. ब्राव्होच्या अनुपस्थितीमध्ये राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नईने जॉस हेजलवूडला संधी दिली. त्या मॅचमध्येही चेन्नईचा पराभव झाला. 10 मॅचमध्ये चेन्नईने 3 मॅच जिंकल्या, तर 7 मॅचमध्ये त्यांच्या पदरी निराशा आली. यामुळे चेन्नईचं प्ले-ऑफमध्ये खेळण्याचं स्वप्न जवळपास भंगलं आहे. चेन्नईच्या टीमने आतापर्यंत जेवढ्या आयपीएल खेळल्या, त्या प्रत्येक वेळी ते प्ले-ऑफमध्ये पोहोचले होते. ब्राव्होच्या अनुपस्थितीमध्ये चेन्नईकडे हेजलवूड, इम्रान ताहीर, मिचेल सॅन्टनर आणि लुंगी एनगिडी हे पर्याय आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या