मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020 : बेन स्टोक्सचं शतक, राजस्थानचा मुंबईवर दणदणीत विजय

IPL 2020 : बेन स्टोक्सचं शतक, राजस्थानचा मुंबईवर दणदणीत विजय

बेन स्टोक्स (Ben Stokes)च्या शतकामुळे राजस्थान (Rajasthan Royals)ने मुंबई (Mumbai Indians)चा 8 विकेटने पराभव केला आहे.

  • Published by:  Shreyas
अबु धाबी, 25 ऑक्टोबर : बेन स्टोक्स (Ben Stokes)च्या शतकामुळे राजस्थान (Rajasthan Royals)ने मुंबई (Mumbai Indians)चा 8 विकेटने पराभव केला आहे. मुंबईने ठेवलेल्या 196 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने 44 रनवर 2 विकेट गमावल्या, पण यानंतर स्टोक्स आणि संजू सॅमसन यांनी नाबाद 152 रनची पार्टनरशीप केली. स्टोक्सने 60 बॉलमध्ये नाबाद 102 केले. स्टोक्सच्या या खेळीमध्ये 14 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता, तर संजू सॅमसनने 31 बॉलमध्ये नाबाद 54 रन केले. संजू सॅमसनने 4 फोर आणि 3 सिक्स लगावले. मुंबईकडून जेम्स पॅटिनसनलाच दोन्ही विकेट मिळाल्या. या मॅचमध्ये मुंबईचा कर्णधार कायरन पोलार्डने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण मुंबईची सुरुवात खराब झाली. फॉर्ममध्ये असलेला क्विंटन डिकॉक लवकर माघारी परतला. यानंतर सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि सौरभ तिवारीने मुंबईचा डाव सावरला, तर हार्दिक पांड्याने शेवटी तुफान फटकेबाजी केली. पांड्याने 21 बॉलमध्ये 60 रन केले. पांड्याने त्याच्या या खेळीमध्ये 2 फोर आणि तब्बल 7 सिक्स लगावले. राजस्थानकडून जोफ्रा आर्चर आणि श्रेयस गोपाळने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या, तर कार्तिक त्यागीला 1 विकेट मिळाली. मुंबईविरुद्धच्या या विजयासोबतच राजस्थानची टीम पॉईंट्स टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावर पोहोचली आहे. राजस्थानने 12 पैकी 5 मॅच जिंकल्या असून 7 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. तर मुंबईची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर कायम आहे. मुंबईने 11 पैकी 7 मॅचमध्ये विजय मिळवला असून 4 मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.
First published:

पुढील बातम्या