Home /News /sport /

IPL 2020 : KKR च्या 'त्या' निर्णयाचा बेन स्टोक्सलाही धक्का, म्हणाला...

IPL 2020 : KKR च्या 'त्या' निर्णयाचा बेन स्टोक्सलाही धक्का, म्हणाला...

IPL 2020 चेन्नई (CSK)विरुद्धच्या मॅचमध्ये कोलकाता (KKR)च्या रणनीतीवर बेन स्टोक्सने शंका उपस्थित केली आहे.

    अबु धाबी, 7 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या चेन्नई (CSK)विरुद्धच्या मॅचमध्ये कोलकात्याच्या बॅट्समनचा संघर्ष पाहायला मिळाला. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या कोलकात्याचा 20 ओव्हरमध्ये 167 रनवर ऑल आऊट झाला. राहुल त्रिपाठी वगळता कोलकात्याच्या इतर कोणत्याही खेळाडूला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. राहुल त्रिपाठीने 51 बॉलमध्ये 81 रनची खेळी केली. टॉस जिंकून पहिले बॅटिंगला येताना कोलकात्याने त्यांच्या रणनीतीमध्ये बदल केला. मागच्या काही वर्षांपासून ओपनिंगला येणाऱ्या सुनील नारायण याच्याऐवजी राहुल त्रिपाठीला त्यांनी ओपनिंगला पाठवलं. राहुल त्रिपाठीनेही मिळालेल्या या संधीचं सोनं केलं. सुनिल नारायण याला ओपनिंगला न पाठवण्याचा निर्णय घेणाऱ्या कोलकात्याने त्याला चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवलं. इयन मॉर्गन, आंद्रे रसेल आणि दिनेश कार्तिक यांच्यासारख्या दिग्गजांच्या आधी सुनील नारायणला पाठवल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. इंग्लंडचा ऑलराऊंडर आणि आयपीएलमध्ये राजस्थानकडून खेळणाऱ्या बेन स्टोक्स यानेही कोलकात्याच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. इयन मॉर्गनच्या आधी सुनील नारायणला पाठवलं? असं ट्विट बेन स्टोक्सने केलं आहे. चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला आलेला सुनील नारायण या मॅचमध्ये 9 बॉलमध्ये 17 रन करुन आऊट झाला. यंदाच्या आयपीएलमध्ये सुनील नारायणची कामगिरी खराब झाली आहे. 5 इनिंगमध्ये त्याने फक्त 44 रन केले आहेत. तर चेन्नई आधीच्या 4 मॅचमध्ये त्याला फक्त 2 विकेट घेता आल्या.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या