IPL 2020 : वडिलांनी रिक्षा चालवून शिकवलं, मुलाची आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी

IPL 2020 : वडिलांनी रिक्षा चालवून शिकवलं, मुलाची आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी

आयपीएल (IPL 2020) च्या जवळपास प्रत्येक मॅचमध्ये बॅट्समन बॉलरची पिसं काढताना पाहायला मिळतात, पण बुधवारचा दिवस याला अपवाद ठरला. बँगलोरच्या मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) ने आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली.

  • Share this:

दुबई, 22 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) च्या जवळपास प्रत्येक मॅचमध्ये बॅट्समन बॉलरची पिसं काढताना पाहायला मिळतात, पण बुधवारचा दिवस याला अपवाद ठरला. बँगलोरच्या मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) ने आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. सिराजने लागोपाठ 2 ओव्हर मेडन टाकून कोलकात्याच्या 3 विकेट घेतल्या. आयपीएलच्या एका मॅचमध्ये 2 मेडन ओव्हर टाकणारा तो पहिला बॉलर ठरला. सिराजने या मॅचमध्ये 4 ओव्हरमध्ये 8 रन देऊन 3 विकेट घेतल्या.

मोहम्मद सिराजने त्याच्या पहिल्याच ओव्हरपासून शाहरुख खानच्या टीमला त्रास दिला. त्याने पहिल्याच ओव्हरच्या लागोपाठ 2 बॉलला राहुल त्रिपाठी आणि नितीश राणाची विकेट घेतली. यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये त्याने टॉम बॅन्टनला माघारी पाठवलं. सिराजने या मॅचमध्ये एकही बाऊंड्री दिली नाही.

वडील चालवायचे रिक्षा

मोहम्मद सिराजला आयपीएलपर्यंतच्या या प्रवासात बराच संघर्ष करावा लागला. हैदराबादमधल्या गरिब कुटुंबामध्ये सिराजचा जन्म झाला. सिराजच्या वडिलांनी रिक्षा चालवून कुटुंब चालवलं. पण रिक्षाचालक असूनही त्यांनी सिराजला कोणतीही गोष्ट कमी पडू दिली नाही. सिराजला क्रिकेट खेळण्यासाठी लागणाऱ्या वस्तू त्यांनी नेहमी आणून दिल्या. मोहम्मद सिराज दिवसभर क्रिकेटचा सराव करायचा, एवढच नाही तर कित्येक वेळा रात्रीही सराव केल्यामुळे सिराजला आईचा मारही खावा लागला.

मोहम्मद सिराजला 2017 साली हैदराबादने 2.6 कोटी रुपयांना विकत घेतलं. 2017 सालीच त्याने भारतासाठी टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि 2019 साली त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली वनडे मॅच खेळली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सिराजला अजून त्याची छाप पाडता आली नाही. पण आयपीएलमध्ये मात्र त्याने आपल्यामध्ये तेवढी क्षमता असल्याचं दाखवून दिलं.

Published by: Shreyas
First published: October 22, 2020, 5:21 PM IST
Tags:

ताज्या बातम्या