IPL 2020 : नेहराच्या टीममध्ये विराटऐवजी सूर्या, तर मुंबईच्या या खेळाडूंना संधी

IPL 2020 : नेहराच्या टीममध्ये विराटऐवजी सूर्या, तर मुंबईच्या या खेळाडूंना संधी

भारताचा माजी बॉलर आशिष नेहरा (Ashish Nehra) यानेही यंदा आयपीएल (IPL 2020) मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची टीम तयार केली आहे.

  • Share this:

मुंबई, 19 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) च्या या मोसमातही मुंबई (Mumbai Indians) ने विजेतेपद पटकावले. फायनलमध्ये मुंबईने दिल्ली( Delhi Capitals) चा पराभव करत मुंबईने पाचव्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. आयपीएल संपल्यानंतर आता माजी क्रिकेटपटू या स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीवर नजर टाकत आहेत. त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धेतील आपली 11 जणांची टीम तयार करत आहेत. भारताचा माजी बॉलर आशिष नेहरा (Ashish Nehra) यानेही यंदाच्या वर्षी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची टीम तयार केली आहे. नेहराने त्याच्या टीममध्ये विराट कोहलीच्या ऐवजी मुंबईच्या सूर्यकुमार यादव याची निवड केली आहे.

आशिष नेहरा याने आपल्या टीममध्ये ओपनर म्हणून स्पर्धेत सर्वाधिक रन करणारा के. एल. राहुल आणि हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर यांची निवड केली आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी त्याने विराट कोहलीची निवड न करता मुंबईच्या सूर्यकुमार यादवला संधी दिली आहे. सूर्यकुमारच्या कामगिरीने प्रभावित झाल्याने मी त्याची कोहलीऐवजी निवड केल्याचे त्याने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले. नेहराने चौथ्या क्रमांकावर आरसीबीच्या एबी डिव्हिलिअर्सची निवड केली आहे. त्याच्याविना कोणतीच टी-20 टीम पूर्ण होऊ शकत नसल्याचं नेहरा म्हणाला.

पाचव्या आणि सहाव्या क्रमांकासाठी त्याने मुंबईच्या ईशान किशन आणि हार्दिक पांड्या या दोन खेळाडूंची निवड केली आहे. ईशान किशन मुंबईसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. तर हार्दिकने शेवटच्या ओव्हरमध्ये काही महत्त्वाच्या खेळी केल्या. विकेट किपर म्हणून देखील नेहराने ईशान किशन याची निवड केली आहे. त्याचबरोबर ऑलराउंडर म्हणून त्याने राजस्थानच्या जोफ्रा आर्चरला स्थान दिलं आहे. स्पिनर म्हणून नेहराने राशिद खान याची देखील निवड केली आहे.

आर्चर आणि राशिद खान बॉलिंगसोबतच चांगली बॅटिंगही करत असल्यामुळे त्यांना संधी दिल्याचं नेहरा म्हणाला. बॉलरच्या यादीमध्ये नेहराने युजवेन्द्र चहल आणि जसप्रीत बुमराह यांची निवड केली आहे. त्याचबरोबर अकराव्या खेळाडूसाठी त्याने रवीचंद्रन अश्विन आणि मोहम्मद शमी या दोघांना पसंती दिली आहे. मॅचमध्ये तीन फास्ट बॉलरची गरज पडली तर शमीला खेळवेन अन्यथा अश्विनला संधी देण्याची प्रतिक्रिया नेहराने दिली. त्याचबरोबर धोनीला संघाबरोबर ठेवणे कठीण असल्याचं मत त्याने मांडलं. खेळाडूंची निवड ही कामगिरीच्या आधारे केल्याने धोनीला संघाबाहेर राहावं लागल्याचं वक्तव्य नेहराने केलं.

आशिष नेहराची टीम

केएल राहुल, डेव्हिड वॉर्नर, सूर्यकुमार यादव, एबी डिव्हिलियर्स, ईशान किशन, हार्दिक पांड्या, जोफ्रा आर्चर, राशिद खान, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, रविचंद्रन अश्विन / मोहम्मद शमी

Published by: Shreyas
First published: November 19, 2020, 9:57 PM IST
Tags:

ताज्या बातम्या