मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020 : आयपीएल इतिहासात सगळ्यात जलद बॉल टाकणारा एनरिक नॉर्किया कोण आहे?

IPL 2020 : आयपीएल इतिहासात सगळ्यात जलद बॉल टाकणारा एनरिक नॉर्किया कोण आहे?

IPL 2020  बुधवारी दिल्ली (Delhi Capitals)आणि राजस्थान (Rajasthan Royals)यांच्यातल्या मॅचवेळी नव्या विक्रमाची नोंद झाली. दिल्लीच्या एनरिक नॉर्किया (Anrich Nortje) ने आयपीएल इतिहासातला सगळ्यात जलद बॉल टाकला.

    दुबई, 15 ऑक्टोबर : बुधवारी दिल्ली (Delhi Capitals)आणि राजस्थान (Rajasthan Royals)यांच्यातल्या मॅचवेळी नव्या विक्रमाची नोंद झाली. दिल्लीच्या एनरिक नॉर्किया (Anrich Nortje) ने आयपीएल इतिहासातला सगळ्यात जलद बॉल टाकला. एनरिक नॉर्कियाने टाकलेला हा बॉल 156.2 किमी प्रती तास या वेगाचा होता. याआधी आयपीएलमध्ये डेल स्टेनने 154.4 किमी प्रती तास या वेगाने बॉल टाकला होता. नॉर्कियाने तिसऱ्या ओव्हरमध्ये हा सगळ्यात जलद बॉल टाकला. पण जॉस बटलरने या बॉलवर फोर मारला. पुढच्याच बॉलवर बटलर बोल्ड झाला. कोण आहे नॉर्किया? दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या एनरिक नॉर्कियाचं डेल स्टेनने बरेच वेळा कौतुक केलं आहे. आयपीएलमध्ये नॉर्किया वारंवार 150 किमी प्रती तासापेक्षा जास्त वेगाने बॉलिंग करत आहे. नॉर्कियाच्या बाऊन्सरना जगातले दिग्गज बॅट्समनही घाबरत आहेत. एनरिक नॉर्कियाचा जन्म दक्षिण आफ्रिकेतल्या पोर्ट एलिजाबेथ शहराजवळ असलेल्या युतेनहागेमध्ये झाला. या शहरात आफ्रिकेतला सगळ्यात मोठा वोक्सवॅगन कारचा कारखाना आहे. नेल्सन मंडेला मेट्रोपोलिटन युनिव्हर्सिटीमध्ये त्याने फायनान्शियल प्लानिंगची डिग्री घेतली आहे. इकडेच एनरिकने फास्ट बॉलिंग करण्याची कला विकसित केली. एनरिक 2018 साली मजांसी सुपर लीग दरम्यान चर्चेत आला. एनरिकने आपल्या फास्ट बॉलिंगच्या जोरावर केप टाऊनच्या 8 विकेट घेतल्या. एनरिक नॉर्कियाला 2019 साली पहिल्यांदा श्रीलंकेविरुद्ध वनडे खेळण्याची संधी मिळाली. भारताविरुद्ध त्याने टेस्टमध्ये पदार्पण केलं. या सीरिजमध्ये त्याने बाऊन्सरने मयंक अगरवालला त्रास दिला. टी-20 मध्येही त्याने भारताविरुद्धच पदार्पण केलं होतं. एनरिक नॉर्किया दुखापतीमुळे मागच्या वर्षीचा वर्ल्ड कप खेळू शकला नाही. मागच्या वर्षी कोलकाता नाईट रायडर्सनी त्याला टीममध्ये घेतलं होतं, पण खांद्याच्या दुखापतीमुळे तो आयपीएल खेळायला आला नव्हता. कोलकात्याने त्याला 20 लाखांच्या बेस प्राईजवर विकत घेतलं होतं. यावर्षी एनरिकला दिल्लीने क्रिस वोक्सच्याऐवजी टीममध्ये घेतलं. वोक्सने यावर्षी आयपीएलमधून माघार घेतली होती.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या