IPL 2020 : चेन्नईच्या पराभवावर जडेजा म्हणाला, 'कार्तिकने धोनी बनून धोनीला हरवलं'

IPL 2020 : चेन्नईच्या पराभवावर जडेजा म्हणाला, 'कार्तिकने धोनी बनून धोनीला हरवलं'

आयपीएल (IPL 2020)च्या बुधवारी झालेल्या मॅचमध्ये कोलकाता (KKR)ने चेन्नई (CSK)चा पराभव केला.

  • Share this:

अबु धाबी, 8 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या बुधवारी झालेल्या मॅचमध्ये कोलकाता (KKR)ने चेन्नई (CSK)चा पराभव केला. चेन्नईने जवळपास जिंकलेली ही मॅच 10 रनने गमावल्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटलं. 3 वेळा आयपीएल जिंकणाऱ्या चेन्नईची रणनीती पाहून अनेक जण हैराण झाले. पण भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाच्या मते दिनेश कार्तिकच्या नेतृत्व गुणांमुळे कोलकात्याचा विजय झाला. कार्तिकने धोनी बनवून धोनीला हरवल्याचं जडेजा म्हणाला.

क्रिकबझ या वेबसाईटशी बोलताना जडेजा म्हणाला, 'कार्तिकच्या रणनीतीमुळे चेन्नईने गुडघे टेकले. कार्तिकने धोनीच्या पद्धतीनेच धोनीला पराभूत केलं. बहुतेक वेळा धोनी स्वत: खेळ चालवतो, पण आज कार्तिकने खेळ चालवला. 10 ओव्हरनंतर 11 वी ओव्हर पॅट कमिन्सला दिली. पॅट कमिन्सवर कोणीही आक्रमण केलं नाही. यानंतर कार्तिकने सुनील नारायणला बॉलिंग दिली, त्यामुळे चेन्नईवर दबाव वाढला. तिकडेच मॅच संपली. दिनेश कार्तिक त्याच्या रणनीतीवर कायम राहिला. 10 ओव्हरनंतरच त्याने नारायणला आणलं.'

माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागला मात्र केकेआरची रणनीती पटली नाही. नारायणचा वापर 10 ओव्हरच्या आधीच करायला पाहिजे होता, असं मत सेहवागने मांडलं. 'कार्तिकने नारायणच्या हातात बॉल एवढ्या उशीरा का दिला, हे मला कळलं नाही. नारायणने वॉटसनला 7 वेळा आऊट केलं. जर नारायणला बॉलिंग दिली असती तर वॉटसन लवकर आऊट झाला असता. निकाल वेगळा लागला असता, तर सगळ्यांनी कार्तिकवर टीका केली असती,' अशी प्रतिक्रिया सेहवागने दिली.

कुठे पलटली कोलकाता-चेन्नईची मॅच?

कोलकाता आणि चेन्नई यांच्यातली मॅच 7 ते 15 ओव्हरमध्येच फिरली. कोलकाताने पहिल्या 6 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 52 रन केले, तर चेन्नईने 1 विकेट गमावून 54 रन ठोकले. यानंतर 7-15 ओव्हरमध्ये कोलकात्याने 76-3 एवढा स्कोअर केला. तर चेन्नईला यादरम्यान 56-2 एवढाच स्कोअर करता आला. शेवटच्या 5 ओव्हरमध्ये चेन्नईने 2 विकेट गमावून 47 रन केले, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

Published by: Shreyas
First published: October 8, 2020, 6:43 PM IST
Tags:

ताज्या बातम्या