दुबई, 7 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) मध्ये सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)ला खुन्नस दिल्यानंतर बँगलोरचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli)वर सोशल मीडियावरुन मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती. यानंतरही विराटने एलिमिनेटर सामन्यात मनिष पांडे (Manish Pandey) याचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. पण सूर्यकुमार यादवप्रमाणेच मनिष पांडेनेही बॅटनेच उत्तर दिलं आणि विराटची बोलती बंद केली. पांडेनं बॅटनेच उत्तर दिल्यानंतर विराट शांत झाला आणि फिल्डिंग करायला लागला.
विराटने मनिष पांडेला केलं स्लेज
आयपीएलचा एलिमिनेटर सामना बँगलोर (RCB) आणि हैदराबाद (SRH) यांच्यात झाला. बँगलोरने ठेवलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या हैदराबादने पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट गमावली. श्रीवत्स गोस्वामी मोहम्मद सिराजच्या बॉलिंगवर पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर मनिष पांडे मैदानात आला. पहिली विकेट लवकर गेल्यामुळे मनिष पांडे थोडा थांबून खेळत होता. त्यावेळी विराट मनिष पांडेजवळ आला आणि 'आज नही मार रहा शॉट' असं म्हणाला. मनिष पांडेने विराटच्या या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं, पण सिराजच्या त्याच ओव्हरला प्रत्युत्तर दिलं.
— pant shirt fc (@pant_fc) November 7, 2020
मोहम्मद सिराजच्या दुसऱ्या बॉलनंतर विराटने मनिष पांडेला उचकवण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्याच ओव्हरच्या चौथ्या बॉलवर मनिष पांडेने मिडविकेटवर जबरदस्त सिक्स मारला. या मॅचमध्ये मनिष पांडेने महत्त्वपूर्ण 24 रनची खेळी केली. बँगलोरने या मॅचमध्ये 20 ओव्हरमध्ये 131 रन केले होते. हैदराबादने हे आव्हान 4 विकेट गमावून आणि 2 बॉलआधीच पूर्ण केलं. या पराभवासोबतच बँगलोरचं या आयपीएलमधलं आव्हान संपुष्टात आलं.