Home /News /sport /

IPL 2020 : एबी डिव्हिलियर्सची वादळ खेळी, बँगलोरकडून राजस्थानचा धुव्वा

IPL 2020 : एबी डिव्हिलियर्सची वादळ खेळी, बँगलोरकडून राजस्थानचा धुव्वा

आयपीएल (IPL 2020) मध्ये एबी डिव्हिलियर्स ( AB De Villiers) ने पुन्हा एकदा वादळी खेळी करून बँगलोर (RCB)ला जिंकवून दिलं आहे.

    दुबई, 17 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) मध्ये एबी डिव्हिलियर्स ( AB De Villiers) ने पुन्हा एकदा वादळी खेळी करून बँगलोर (RCB)ला जिंकवून दिलं आहे. राजस्थान (Rajasthan Royals)ने दिलेल्या 178 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना बँगलोरची अवस्था कठीण झाली होती, पण एबी डिव्हिलियर्सने 22 बॉलमध्ये नाबाद 55 रन करुन बँगलोरचा विजय सोपा केला. एबीच्या या खेळीमध्ये तब्बल 6 सिक्स आणि एका फोरचा समावेश होता. राजस्थानच्या आव्हानाचा पाठलाग करताना बँगलोरची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये संघर्ष करणाऱ्या एरॉन फिंचला या मॅचमध्येही मोठा स्कोअर करता आला नाही. कर्णधार विराट कोहलीने 32 बॉलमध्ये 43 रन केले. विराटची विकेट गेल्यानंतर बँगलोरला हे आव्हान कठीण जाईल, असं वाटत होतं, पण बँगलोरने 19व्या ओव्हरमध्ये उनाडकटला 25 रन काढले. एबीने या ओव्हरमध्ये तीन सिक्स लगावल्या. राजस्थानकडून श्रेयस गोपाळ, कार्तिक त्यागी आणि राहुल तेवतिया यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. या मॅचमध्ये राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. या मोसमात फॉर्मसाठी झगडणाऱ्या स्मिथला या मॅचमध्ये सूर गवसला. त्याने 36 बॉलमध्ये 57 रन करुन राजस्थानला 177 रनपर्यंत पोहोचवलं. बँगलोरकडून क्रिस मॉरिसला 4 विकेट तर युझवेंद्र चहलने 2 विकेट घेतल्या. बँगलोरचा यंदाच्या मोसमातला हा सहावा विजय आहे. 9 पैकी फक्त 3 मॅचमध्येच त्यांचा पराभव झाला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये बँगलोरची टीम तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबई, दिल्ली आणि बँगलोर या तिन्ही टीमचे 12 पॉईंट्स असले, तरी नेट रनरेटमुळे विराटच्या टीमला तिसऱ्या स्थानावर राहावं लागलं आहे. दुसरीकडे राजस्थानचा या हंगामातला हा सहावा पराभव आहे. 9 पैकी फक्त 3 मॅचच राजस्थानला जिंकता आल्या आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये राजस्थानची टीम सातव्या क्रमांकावर आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या