Home /News /sport /

IPL च्या मेगा ऑक्शनआधी आकाश चोप्राचा मुंबई इंडियन्सना मोलाचा सल्ला

IPL च्या मेगा ऑक्शनआधी आकाश चोप्राचा मुंबई इंडियन्सना मोलाचा सल्ला

आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमातही मुंबई (Mumbai Indians) चा दबदबा राहिला. आयपीएलसाठी लिलाव झाला तर टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने मुंबईला सल्ला दिला आहे.

    मुंबई : आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमातही मुंबई (Mumbai Indians) चा दबदबा राहिला. फायनलमध्ये दिल्ली (Delhi Capitals) चा पराभव करत मुंबईने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. यंदाच्या वर्षी प्ले-ऑफमध्ये पोहोचणारी मुंबई पहिली टीम होती. आयपीएलच्या पुढच्या मोसमासाठी आता बीसीसीआय नवी टीम आणण्याच्या आणि मेगा ऑक्शन घेण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआयने जर मोठा लिलाव घेतला, तर प्रत्येक टीमला त्यांचे खेळाडू सोडून द्यावे लागतील, सोबतच त्यांना काही खेळाडू कायम ठेवायची परवानगी मिळेल. आयपीएलसाठी लिलाव झाला तर टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने मुंबईला सल्ला दिला आहे. मुंबईने पुढच्या मोसमासाठी लिलावाला परवानगीच देता कामा नये. मुंबईची टीम सर्वोत्तम आहे, पण लिलाव झाला तर त्यांच्या त्रूटीहिन योजनेवर परिणाम होईल, असं आकाश चोप्रा त्याच्या युट्यूब चॅनलवर म्हणाला आहे. 'जर लिलाव झाला तर तुम्ही 5-6 खेळाडूंना कायम ठेवू शकता. पण त्यामुळे मोठे बदल होतात. त्यांना सगळ्या खेळाडूंना टीममध्ये ठेवता येणार नाही. त्यांच्याकडे सगळे चांगले खेळाडू असल्यामुळे त्यांना काही खेळाडू सोडावे लागतील. जर एकदा गोष्टी बदलल्या तर सगळच बदलून जातं. कमीत कमी तीन वर्ष तरी लिलाव होता कामा नये, असंच मुंबईच्या टीमला वाटत असेल,' असं वक्तव्य आकाश चोप्राने केलं. सध्या मुंबईची टीम आणि इतर टीम यांच्यामध्ये खूप फरक आहे, त्यामुळे ते पुढच्यावर्षीही चांगली कामगिरी करतील, असा विश्वास आकाश चोप्राने व्यक्त केला.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या