'विराट' रागाचा सिनिअर खेळाडूंनाही तडाखा, पंचांवरही भडकला

एकहाती सामना जिंकून देण्याची ताकद असलेल्या विराटचा स्वभावही खेळाप्रमाणे आक्रमक आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 25, 2019 09:09 PM IST

'विराट' रागाचा सिनिअर खेळाडूंनाही तडाखा, पंचांवरही भडकला

आयसीसीच्या टॉप क्लास खेळाडूंमध्ये विराट अव्वल स्थानावर आहे. आपल्या खेळीच्या जोरावर सामना जिंकून देण्याची ताकद त्याच्यात आहे. त्याची फलंदाजी, फिटनेस, नेतृत्व याशिवाय रागही भरपूर आहे. यामुळे अनेकदा तो वादात अडकला आहे.

2013 मध्ये विराट कोहली आणि भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांच्यात वाद झाला होता. कोहली बाद झाल्यानंतर गौतम गंभीरने केलेल्या टिप्पणीने विराटला राग आला होता. तेव्हा पंचांनी मध्यस्थी करून वाद मिटवला होता.

आयपीएयलमध्ये यंदाच्या हंगामात मंगळवारी झालेल्या सामन्यात अश्विनला झेलबाद केल्यानंतरही त्याने राग व्यक्त केला होता. त्यावेळी विराटने अपशब्द वापरले असेही म्हटले जात आहे.

Loading...

भारताचा सलामीवीर शिखर धवनलाही विराटच्या रागाला सामोरं जावं लागलं होतं. इंग्लंड दौऱ्यावर फलंदाजी क्रमांक आणि फॉर्मवरूनही वाद झाला होता.

28 मार्चला मुंबई विरुद्धच्या सामन्यात तो पंचांवरही भडकला होता. शेवटच्या चेंडूवर 7 धावा हव्या असताना नो बॉल न दिल्याने आरसीबीचा पराभव झाला. लसिथ मलिंगाचा अखेरचा चेंडू नो बॉल होता. मात्र, पंचांच्या चुकीने आरसीबीला पराभूत व्हावं लागलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 25, 2019 09:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...