'विराट तू सिनिअर असल्याचा फायदा घेऊ नको'

लक्ष विचलित करण्यासाठी ऋषभ पंत बडबड करायचा असं विराटने म्हटलं होतं. त्यानंतर पंतने ड्रेसिंगरूममधला किस्सा सांगितला

News18 Lokmat | Updated On: Apr 7, 2019 05:38 PM IST

'विराट तू सिनिअर असल्याचा फायदा घेऊ नको'

बेंगळुरू, 07 एप्रिल : आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा यष्टीरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंत त्याच्या फटकेबाजीशिवाय यष्टीमागे उभा राहून स्लेजिंगसाठी ओळखला जातो. एका मुलाखतीत पंतबद्दल सांगताना विराट कोहलीनेही पंतने स्लेजिंग केल्याचं सांगितलं होतं. विराट कोहलीचं लक्ष विचलित करण्यासाठी ऋषभ पंत सतत बडबड करत होता. त्यानंतर विराटने त्याला दम देत कधीतरी ड्रेसिंगरूममध्ये येशील असं म्हटलं होतं.

विराटच्या मुलाखतीवर पंतने प्रतिक्रिया दिली आहे. आयपीएलच्या 20 व्या सामन्याआधी पंतने स्टार स्पोर्टस् सोबत चर्चा केली. तो म्हणाला की, विराटपासून वाचण्यासाठी गोलंदाजांना सल्ला दिला होता. त्यानंतर विराटने मला कधीतरी ड्रेसिंगरूममध्ये भेटशील असं म्हटलं होतं. त्यानंतर माझी संघात निवड झाली तेव्हा ड्रेसिंग रूममध्ये पोहचलो. त्यावेळी तिथं दंगामस्ती सुरू होती. त्यावेळी मी विराटला म्हटलं की, सिनियर असल्याचा फायदा घेऊ नको.

आजच्या सामन्यात आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्सने संघात कोणताही बदल केलेला नाही.

आरसीबी संघ : पार्थिव पटेल, विराट कोहली (कर्णधार), एबी डीव्हिलियर्स, मार्कस स्टोइनिस, मोइन अली, आकाशदीप नाथ, पवन नेगी, टीम साउथी, नवदीप सैनी, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज

दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, राहुल तेवतिया, कॉलिन इनग्राम, ख्रिस मॉरिस, अक्षर पटेल, कासिगो रबाडा, ईशांत शर्मा, संदीप लामिछाने

Loading...

VIDEO: 'जिथे भाजप-सेनेचे उमेदवार तिथे राज ठाकरेंनी हमखास जाहीर सभा घ्यावी'


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 7, 2019 05:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...