IPL 2019 : 'या' गोलंदाजाची धोनीला भीती, मारला नाही एकही चौकार

महेंद्रसिंग धोनीला या गोलंदाजाच्या चेंडूवर एकही चौकार किंवा षटकार मारता आलेला नाही.

News18 Lokmat | Updated On: Apr 15, 2019 10:27 AM IST

IPL 2019 : 'या' गोलंदाजाची धोनीला भीती, मारला नाही एकही चौकार


महेंद्रसिंग धोनीच्या शांत स्वभावासह यष्टीरक्षण आणि फलंदाजीचे चाहते खूप आहेत. त्याच्या फलंदाजीसमोर अनेक गोलंदाजांना घाम फुटतो. तरीही एका गोलंदाजाला मात्र धोनी घाबरतो. केकेआरचा गोलंदाज सुनिल नरेनच्या गोलंदाजीवर खेळाताना धोनी सावध भूमिका घेतो. रविवारी झालेल्या सामन्यात नरेनने त्याला पायचित बाद केले.

आतापर्यंत सुनिल नरेनच्या गोलंदाजीवर धोनीला एकही चौकार मारता आलेला नाही. टी 20 धोनीने सुनील नरेनच्या गोलंदाजीवर 76 चेंडू खेळले आहेत. यावर त्याला आतापर्यंत फक्त 38 धावाच करता आल्या आहेत. म्हणजे नरेनविरुद्ध धोनीला स्ट्राइक रेट फक्त 50 इतका आहे. यात धोनी दोनवेळा बाद झाला आहे.

सुनील नरेन दोन्ही बाजूला चेंडू वळवू शकतो. यात धोनीची अडचण होते. तसेच विकेट टू विकेट गोलंदाजी करण्यामुळे धोनीला मोठा फटका खेळणं कठीण जातं. धोनी तसा सहजासहजी कोणताही धोका पत्करत नाही आणि त्यात नरेन धोनीला संधीच देत नाही.

'भाड में गया कानून, भाड में गई आचारसंहिता'

Loading...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 15, 2019 10:27 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...