KKR vs RR : राजस्थानचा कोलकातावर 3 गडी राखून विजय

कार्तिकची खेळी व्यर्थ, घरच्या मैदानावर कोलकात्याचा पराभव

News18 Lokmat | Updated On: Apr 25, 2019 11:55 PM IST

KKR vs RR : राजस्थानचा कोलकातावर 3 गडी राखून विजय

कोलकाता, 25 एप्रिल : कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकच्या नाबाद 97 धावांच्या खेळीनंतरही राजस्थानने 3 गडी राखून सामना जिंकल्या. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात राजस्थानने बाजी मारली. कोलकात्याने दिलेले 176 धावांचे आव्हान 19.2 षटकांत 7 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि संजू सॅमसन यांच्या अर्धशतकी भागिदारीनंतर राजस्थानची अवस्था 5 बाद 98 अशी झाली होती. त्यानंतर डावाची सूत्रे आपल्या हाती घेत रियान परागने 31 चेंडूत 47 धावांची खेळी केली. 19 व्या षटकात तो हिट विकेट बाद झाला. त्याला स्टुअर्ट बिन्नी, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपालने साथ दिली. जोफ्रा आर्चरने 12 चेंडूत 27 धावांची खेळी करत कोलकाताचा विजय हिरावून घेतला.

नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेल्या राजस्थानने कोलकाता नाइट रायडर्सला 20 षटकांत 6 बाद 175 धावांवर रोखले.दिनेश कार्तिकने 50 चेंडूत 97 धावा केल्या. कोलकाताच्या इतर फलंदाजांना राजस्थानच्या गोलंदाजांनी जखडून ठेवलं. प्रथम फलंदाजीला मैदानात उतरलेल्या कोलकाताला वरुण अॅरॉनने पहिल्याच षटकात ख्रिस लिनला शून्यावर बाद करून पहिला धक्का दिला. त्यानंतर पाचव्या षटकात शुभमन गिललासुद्धा अॅरॉनने बाद केले. गिल 14 चेंडूत 14 धावा करून बाद झाला. त्यानंतर 8 व्या षटकात श्रेयस गोपालच्या गोलंदाजीवर नितीश राणा झेलबाद झाला. त्याने 26 चेंडूत 21 धाव केल्या. कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिक आणि सुनिल नरेन यांनी संघाचा डाव सावरला. नरेन 11 धावा काढून धावबाद झाला. त्यानंतर मैदानात आलेल्या रसेलने 14 धावा केल्या. त्याला थॉमसने बाद केले. त्यानंतर आलेल्या ब्रेथवेटने 3 चेंडूत 5 धावा केल्या. जयदेव उनादकटच्या गोलंदाजीवर उंच फटका मारण्याच्या नादात तो रहाणेच्या हाती झेल देऊन बाद झाला.

कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात इ़डन गार्डनवर सामना होत आहे. दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्त्वाचा असून पराभवामुळे ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर जाण्याची शक्यता आहे.

केकेआर गुणतक्त्यात सहाव्या क्रमांकावर आहे. मागच्या सलग पाच सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. तर शेवटच्या क्रमांकावर असलेल्या राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत 3 विजय मिळवले आहेत.

इडन गार्डनवर होत असलेल्या सामन्यात कोलकाता आणि राजस्थानने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला आहे. कोलकात्याने हॅरि गर्नी आणि केसी करियप्पा यांना विश्रांती दिली आहे. तर त्यांच्या जागी प्रसिद्ध कृष्णा आणि कार्लोस ब्रेथवेटला संघात स्थान दिले आहे. राजस्थानने अश्टन टर्नर आणि धवल कुलकर्णीऐवजी ओशन थॉमस आणि वरुण एरॉनला संधी दिली आहे.

Loading...

मौत का कुऑं! स्टंटमननं जवळून पाहिला मृत्यू, थरारक घटनेचा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 25, 2019 07:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...