IPL 2019 : मंकडिंगनंतर अश्विनच्या गोलंदाजी आणि नेतृत्वावर टीका, चाहत्यांनी दिला 'हा' सल्ला

IPL 2019 : मंकडिंगनंतर अश्विनच्या गोलंदाजी आणि नेतृत्वावर टीका, चाहत्यांनी दिला 'हा' सल्ला

अश्विनच्या चुकीमुळे आंद्रे रसेलला जीवदान मिळालं आणि त्यामुळेच केकेआरला 200 धावांचा टप्पा पार करता आला.

  • Share this:

कोलकाता, 28 मार्च : राजस्थान रॉयल्सचा फलंदाज जोस बटलरला मंकडिंग पद्धतीने बाद केल्यानंतर पंजाबचा कर्णधार आर. अश्विन वादात अडकला आहे. त्यानंतर ईडन गार्डनवर झालेल्या सामन्यात कोलकाताच्या फलंदाजांनी अश्विनच्या गोलंदाजीवर चौकार षटकारांची आतषबाजीच केली. या सामन्यात अश्विनच्या चुकीचा फायदा कोलकताच्या संघाला झाला.

अश्विनच्या गोलंदाजीवर 4 षटकांत 11.75 च्या सरासरीने 47 धावा काढल्या. यात पाच षटकारांचाही समावेश होता. पाच षटकारांपैकी 4 षटकार एकट्या नीतीश राणाने मारले होते.

किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार असलेल्या आर अश्विनच्या एका चुकीचा फटका संघाला बसला. 17 व्या षटकांत मोहम्मद शमीने आंद्रे रसेलला यॉर्करवर त्रिफळाचित केलं होतं. पण क्षेत्ररक्षणावेळी तीस यार्डमध्ये तीनच खेळाडू होते. यामुळे शमीचा चेंडू नो बॉल ठरवण्यात आला. यामुळे रसेलला जीवदान मिळालं. त्याने याचा फायदा घेत 17 चेंडूत 48 धावांची खेळी केली.

राजस्थानविरुद्ध मंकडिंग प्रकरण आणि कोलकाताविरुद्ध खराब गोलंदाजीसह अश्विनच्या नेतृत्वावर टीका केली जात आहे. अनेक चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे. तसेच कर्णधारपदावरुन हटवण्याची मागणी केली जात आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ट्विटरवर करण्यात आलेल्या पोस्टवर अश्विनला कर्णधारपदावरुन हटवण्याची मागणी करणाऱ्या कमेंट दिसत आहेत.

VIDEO: ट्रॅफीकमुळे पार्थ पवारांना झाला उशीर, पाहा काय केलं

First published: March 28, 2019, 8:11 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading