नशीब असावे तर धोनी सारखे; 143 किमी वेगाने येणारा चेंडू विकेट घेऊ शकला नाही!

राजस्थान विरुद्ध प्रथम फलंदाजी करण्यास आलेल्या चेन्नई संघाला एक मोठे जीवनदान मिळाले आणि तेही एम.एस.धोनीचे...

News18 Lokmat | Updated On: Apr 1, 2019 08:08 AM IST

नशीब असावे तर धोनी सारखे; 143 किमी वेगाने येणारा चेंडू विकेट घेऊ शकला नाही!

चेन्नई, 01 एप्रिल: चेपॉक स्टेडियमवर काल रात्री झालेल्या सामन्यात चेन्नईने राजस्थानचा पराभव करत सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. या सामन्यात चर्चा झाली ती पुन्हा एकदा धोनी आणि त्याच्या खेळीची. त्याच बरोबर आणखी एक किस्सा झाला ज्यामुळे आता असे बोलले जात आहे की, नशीब असावे तर धोनी सारखे. होय, राजस्थान विरुद्ध प्रथम फलंदाजी करण्यास आलेल्या चेन्नई संघाला एक मोठे जीवनदान मिळाले आणि तेही एम.एस.धोनीचे...

राजस्थानचा गोलंदाज जोफ्रा आर्चर याच्या चेंडूवर धोनीला जीवनदान मिळाले. आर्चरचा हा चेंडू 143 किलो मीटर वेगाने आला. धोनीच्या बॅटला लागून चेंडू विकेटला लागला. पण बेल्स पडल्या नाहीत. या घटनेने गोलंदाजासह राजस्थान संघातील सर्व खेळाडू हैराण झाले. धोनीला मिळालेल्या या जीवनदानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय झाले नेमके?

राजस्थानच्या सहाव्या षटकात जोफ्रा आर्चर त्याची वैयक्तीक दुसरी ओव्हर टाकत होता. या ओव्हरमधील चौथा चेंडू प्रथम धोनीच्या बॅट आणि नंतर विकेटला लागला. पण 143 किलो मीटर वेगाने आलेला हा चेंडू धोनीच्या बेल्स पाडू शकला नाही. बेल्स पडल्या नाहीत हे पाहून राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणे, बेन स्टोक्स आणि स्टीव्हन स्मिथ यांना धक्काच बसला. धोनीला मिळालेले हे जीवनदान राजस्थानसाठी मोठा झटका देणारे होते. कारण तेव्हा चेन्नईच्या ३ विकेट पडल्या होत्या आणि जर धोनी बाद झाला असता तर चेन्नई आणखी अडचणीत सापडली असती.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Loading...

अर्थात मिळालेल्य जीवनदानाचा फायदा धोनीने पुरेपुर करुन घेतला. त्याने रैनासोबत चौथ्या विकेटसाठी 61 धावा जोडल्या. इतक नव्हे तर अखेरच्या षटकात राजस्थानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या सामन्यात धोनीने 46 चेंडूत नाबाद 75 धावांची खेळी केली. यात 4 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता.


VIDEO : विखे आणि थोरात एकत्र पण एकमेकांकडे पाहिलेही नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2019 07:47 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...