S M L

फरशीवर झोपले धोनी आणि साक्षी, फोटो झाला व्हायरल

कोलकात्याविरुद्ध जिंकल्यानंतर चेन्नईचा सामना आता राजस्थान रॉयल्स यांच्याशी होणार आहे.

Updated On: Apr 10, 2019 12:58 PM IST

फरशीवर झोपले धोनी आणि साक्षी, फोटो झाला व्हायरल

चेन्नई, 10 एप्रिल : महेंद्रसिंग धोनीच्या संघाने मंगळवारी घरच्या मैदानावर कोलकाता नाइट राय़डर्सवर 7 विकेटने विजय मिळवला. त्यानंतर विजयाचा जल्लोष करण्यासाठीही त्यांच्याकडे पुरेसा वेळ नव्हता. कारण त्यांना पुढच्या सामन्यातसाठी जयपूरला जायचे होते. यावेळी विमानतळावर विमानाची वाट पाहत असलेला त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

After getting used to IPL timing this is what happens if u have a morning flight

A post shared by M S Dhoni (@mahi7781) on
धोनीने सोशल मीडियावर एक फोटो अपलोड केला आहे. त्यात धोनी आणि त्याची पत्नी विमानतळावर फरशीवरच झोपलेले दिसत आहेत. हा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोला कॅप्शन देताना धोनीनं म्हटलं आहे की, आयपीएलच्या वेळेची सवय झाल्यानंतर आणि सकाळी लवकर विमान असलं की असंच होतं.

आयपीएलच्या वेळापत्रकामुळे खेळांडूंना थकवा येतो. सलग सामने असल्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करताना खेळाडूंना धावपळ करावी लागते. सीएसकेला आता पुढचे चार सामने चेन्नईतून बाहेर खेळायचे आहेत. राजस्थाननंतर त्यांचा सामना कोलकात्याला असणार आहे.

VIDEO : 'अशा नेत्याला राष्ट्रवादीतून हाकला' ऐकताच धनंजय मुंडे पोट धरून हसले

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 10, 2019 12:58 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close