News18 Lokmat

99 धावांवर नाबाद तरीही गेलचं 'शतक', रैनाशी बरोबरी

ख्रिस गेलने बेंगळुरुविरुद्ध 64 चेंडूत नाबाद 99 धावा केल्या.

News18 Lokmat | Updated On: Apr 14, 2019 09:18 AM IST

99 धावांवर नाबाद तरीही गेलचं 'शतक', रैनाशी बरोबरी

मोहाली, 14 एप्रिल : युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेल जर शेवटच्या षटकापर्यंत खेळला तर त्याच्याकडून शतकाची अपेक्षा केली जाते. बेंगळुरूविरुद्ध झालेल्या सामन्यात मात्र त्याचे शतक केवळ एका धावेनं हुकलं.

ख्रिस गेलने 64 चेंडूत 99 धावा केल्या. त्याच्या 100 धावा झाल्या नसल्या तरी त्याने अनोखे शतक केले आहे. बेंगळुरुविरूद्ध 99 धावांवर नाबाद राहणाऱ्या ख्रिस गेलने चेन्नईचा फलंदाज सुरेश रैनाशी बरोबरी केली आहे. रैनासुद्धा 99 धावांवर नाबाद राहिला होता. त्याने 2013 मध्ये हैदराबादविरुद्ध ही खेळी केली होती.

वाचा : World Cup : सेहवागने निवडला भारतीय संघ, कर्णधार कोण?

बेंगळुरूविरुद्ध गेलने शतक केले असते तर त्याचे हे 22 वे टी20 शतक ठरले असते. शनिवारी झालेल्या सामन्यात त्याच्या 100 धावा झाल्या नसल्या तरी 50 पेक्षा जास्त धावा करण्यात त्याचे शतक झाले. त्याच्यानंतर डेव्हिड वॉर्नरचा नंबर लागतो. त्याने आतापर्यंत 73 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

वाचा : गावस्करांनी IPL मधून शोधला वर्ल्डकपसाठी चौथ्या नंबरचा खेळाडू

Loading...

गेलला 99 धावांच्या खेळीत दोनवेळा जीवदान मिळाले. बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीनेच त्याला जीवदान दिले. पहिल्या षटकात तो पायचित होता मात्र दोन्ही पंचांनी नॉट आऊट दिलं. यावेळी विराटने रिव्यू घेतला नाही. तर उमेश यादवच्या गोलंदाजीवर कोहलीने सोपा झेल सोडला.

SPECIAL REPORT : विनायक मेटेंच्या खेळीने मुख्यमंत्री फडणवीस संतापले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 14, 2019 09:18 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...