धोनीने घेतला धडा, गेलला रोखण्यासाठी खास खेळाडू संघात

धोनीने घेतला धडा, गेलला रोखण्यासाठी खास खेळाडू संघात

पंजाबविरुद्धच्या सामन्यात चेन्नईने संघात तीन बदल केले.

  • Share this:

चेन्नई, 06 एप्रिल : मुंबई इंडियन्स विरुद्ध पराभवानंतर महेंद्र सिंग धोनीने संघात तीन बदल केले आहेत. किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध नाणेफेक जिंकून धोनीने फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याने संघात तीन बदल केले असून शार्दुल ठाकुर, मोहित शर्मा यांना विश्रांती दिली आहे तर दुखापतीमुळे ब्राव्हो खेळू शकणार नाही. त्यांच्या जागी फाफ डुप्लेसी, हरभजन सिंग आणि स्कॉट कुग्गलेन यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.

चेन्नईला या हंगामात पहिला विजय मिळवून देण्यात हरभजन सिंगने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. खेळपट्टी संथ असल्याने फिरकीचा फायदा होऊ शकतो. तसेच पंजाबचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल आणि डेविड मिलर यांना रोखण्यासाठी फिरकीचे अस्त्र कामाला येऊ शकते यासाठी धोनीने हा निर्णय घेतला.

साउथ आफ्रिकेचा डुप्लेसी संथ खेळपट्टीवर चांगली कामगिरी करतो. तसेच संघ अडचणीत असताना दबाव न घेता खेळण्यात तो माहिर आहे. त्याला यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच खेळण्याची संधी देण्यात आली आहे.

न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू स्कॉट कुगलेनला ब्राव्होच्या जागी संघात घेतलं आहे. दुखापतीमुळे ब्राव्होला विश्रांती देण्यात आली आहे. कुगलेन हा गोलंदाजीबरोबर फलंदाजीही करतो.

आतापर्यंत आयपीएलमध्ये चेन्नई आणि पंजाब यांच्यात 19 सामने झाले आहेत. यातील 11 सामन्यात चेन्नईने तर पंजाबने 8 सामन्यात विजय मिळवला आहे.

चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शेन वॉटसन, अंबाती रायडु, सुरेश रैना, केदार जाधव, फाफ डुप्लेसीस, रवींद्र जडेजा, स्कॉट कुगलेइन, दीपक चहर, हरभजन सिंग, इम्रान ताहिर

किंग्ज इलेव्हन पंजाब : रविचंद्रन अश्विन (कर्णधार), केएल राहुल, ख्रिस गेल, मयंक अग्रवाल, सर्फराज खान, मनदीप सिंह, डेविड मिलर, सॅम करन, एम अश्विन, अँड्र्यू टाय, मोहम्मद शमी

 

First published: April 6, 2019, 4:55 PM IST

ताज्या बातम्या