आयपीएलचा रणसंग्राम 11 एप्रिलपासून, पहिला सामना मुंबापुरीत !

आयपीएलचा रणसंग्राम 11 एप्रिलपासून, पहिला सामना मुंबापुरीत !

इंडियन प्रिमिअर लिग म्हणजेच आयपीएलचं 11 पर्व 6 एप्रिलपासून सुरू होणार आहे. 6 एप्रिलला मुंबईत उद्घाटन सोहळा पार पडेल.

  • Share this:

22 जानेवारी : इंडियन प्रिमिअर लिग म्हणजेच आयपीएलचं 11 पर्व 6 एप्रिलपासून सुरू होणार आहे. 6 एप्रिलला मुंबईत उद्घाटन सोहळा पार पडेल. आणि 7 एप्रिलला आयपीएलचा पहिला सामना मुंबईत रंगणार आहे. 27 मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना पार पडणार असल्यास आयपीएलचे आयुक्त राजीव शुक्ला यांनी सांगितलं आहे. आयपीएलच्या 11व्या पर्वासाठी 27 आणि 28 जानेवारीला लिलाव केला जाईल.

आयपीएल लिलावात एकूण 16 खेळाडू असणार आहेत. यामध्ये इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स, भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्र अश्विन, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क आणि इंग्लंडचा कर्णधार जो रूट यांचा समावेश आहे. आयपीएलच्या लिलावासाठी एक हजार खेळाडूंनी नोंदणी केली होती पण बीसीसीआयनं 578 खेळाडूंना त्यातून वगळलं आहे.

आयपीएलच्या खेळाडूंचं त्यांच्या प्रोफाइलनुसार आठ गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आलं आहे. त्यात आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या गटाला 2 कोटी, 1.5 कोटी रुपये, एक कोटी रुपये, 75 लाख रुपये आणि रुपये 50 लाख देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर अनकॅप प्लेअरची आधारभूत किंमत अनुक्रमे 40 लाख, 30 लाख आणि 20 लाख रुपये असणार आहे.

First Published: Jan 22, 2018 07:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading