...तेव्हा गांगुलीला चुकीचं आऊट दिलं, 21 वर्षानंतर इंझमामची कबुली

...तेव्हा गांगुलीला चुकीचं आऊट दिलं, 21 वर्षानंतर इंझमामची कबुली

पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक (Inzamam Ul Haq) याने 21 वर्षानंतर चेन्नई टेस्टमध्ये सौरव गांगुली (Sourav Ganguly) ला चुकीच्या पद्धतीन आऊट दिल्याचं मान्य केलं आहे.

  • Share this:

मुंबई : पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक (Inzamam Ul Haq) याने 21 वर्षानंतर चेन्नई टेस्टमध्ये सौरव गांगुली (Sourav Ganguly) ला चुकीच्या पद्धतीन आऊट दिल्याचं मान्य केलं आहे. 1999 साली झालेल्या त्या टेस्ट मॅचमध्ये गांगुलीचा कॅच संशयास्पद असल्याचं इंझमाम म्हणाला आहे. भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातल्या दोन टेस्ट मॅचच्या सीरिजची पहिली मॅच पाकिस्तानने 12 रनने जिंकली होती. या मॅचच्या दुसऱ्या इनिंगमधला गांगुलीचा कॅच वादग्रस्त होता.

इंझमाम उल हकने भारताचा दिग्गज ऑफ स्पिनर आर.अश्विन (R. Ashwin) सोबत त्याच्या युट्यूब चॅनलवर संवाद साधला. ही अश्विनने आयुष्यात पहिल्यांदा स्टेडियममध्ये जाऊन बघितलेली टेस्ट मॅच होती, त्यामुळे अश्विनने इंझमामशी बोलताना या टेस्ट मॅचच्या आठवणींना उजाळा दिला. गांगुलीने मारलेला कॅच सिली पॉईंटच्या दिशेने गेला, त्यानंतर मोईन खानने कॅच पकडला. त्यावेळचे कॅमेरे इतके चांगले नसल्यामुळे गांगुली खरंच आऊट होता का नव्हता, याबाबत अजूनही कळू शकलं नव्हतं.

चेन्नईतली 1999 सालची ती टेस्ट इंझमामची भारतातली पहिलीच टेस्ट मॅच होती. या घटनेवेळी अजहर महमूद आणि मोईन खान या दोनच व्यक्ती होत्या. गांगुलीने शॉट मारला तेव्हा बॉल अजहरच्या शरिराला लागला, यानंतर मोईनने कॅच पकडला. या कॅचबाबत मी स्पष्टपणे सांगू शकत नाही, कारण अजहर त्या मॅचमध्ये खेळत नव्हता. दुसऱ्या इनिंगमध्ये माझी तब्येत ठीक नव्हती, म्हणून माझ्याऐवजी अजहर फिल्डिंगला आल्याचं इंझमाम म्हणाला.

त्यावेळी मी मैदानात नव्हतो, पण एवढं मात्र नक्की तो कॅच संशयास्पद होता, असं इंझमामने कबूल केलं. इंझमामने हे स्वीकार केल्यानंतर अश्विन हसला आणि तुम्ही हे स्वीकार केल्याबद्दल तुम्हाला सलाम, असं म्हणाला.

Published by: Shreyas
First published: November 21, 2020, 9:09 PM IST
Tags:

ताज्या बातम्या