मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /क्रिकेट इतिहासातील एकमेव घटना! या टीमने एकाच वेळी खेळल्या 2 टेस्ट मॅच, एक जिंकली तर दुसरी ड्रॉ

क्रिकेट इतिहासातील एकमेव घटना! या टीमने एकाच वेळी खेळल्या 2 टेस्ट मॅच, एक जिंकली तर दुसरी ड्रॉ

इंग्लंडने एकाच वेळी खेळले होते 2 कसोटी सामने (एएफपी)

इंग्लंडने एकाच वेळी खेळले होते 2 कसोटी सामने (एएफपी)

91 वर्षांपूर्वी इंग्लंडच्या टीमनं एकाच वेळी 2 देशांमध्ये 2 वेगवेगळ्या टेस्ट मॅच खेळल्या होत्या. यातील एक मॅच त्यांनी जिंकली होती तर दुसरी मॅच ड्रॉ झाली होती. संपूर्ण क्रिकेट इतिहासामध्ये अशी घटना एकदाच घडली आहे.

  नवी दिल्ली, 07 डिसेंबर: क्रिकेट (Cricket) या खेळाची सुरुवात इंग्लंडमध्ये (England) झाल्यानं या देशाला क्रिकेटचा 'जनक' म्हटलं जातं. क्रिकेटची पहिली इंटरनॅशनल मॅचही इंग्लंडनेच खेळली. सध्या विविध फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळलं जात असलं तरी त्याची सुरुवात मात्र, टेस्टपासून (Test Cricket History) झाली होती. एक टीम एकावेळी एकाच देशासोबत मॅच खेळू शकते, असा समज आहे. साधारणपणे असंच केलं जातं. मात्र, आजपासून 91 वर्षांपूर्वी इंग्लंडच्या टीमनं एकाच वेळी 2 देशांमध्ये 2 वेगवेगळ्या टेस्ट मॅच खेळल्या होत्या. यातील एक मॅच त्यांनी जिंकली होती तर दुसरी मॅच ड्रॉ झाली होती. संपूर्ण क्रिकेट इतिहासामध्ये अशी घटना एकदाच घडली आहे. या रंजक घटनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

  इंग्लंडनं एकाच वेळी खेळलेल्या दोन टेस्ट मॅचपैकी एक मॅच न्यूझीलंडविरुद्ध झाली होती तर दुसरी वेस्ट इंडिजविरुद्ध झाली होती. 10 ते 13 जानेवारी 1930 दरम्यान इंग्लंड आणि न्यूझीलंड (England vs New Zealand) यांच्यात न्यूझीलंडमधील ख्राईस्ट चर्च येथे टेस्ट मॅच खेळवली गेली होती. न्यूझीलंडसाठी ही मॅच ऐतिहासिक होती कारण ही त्यांची पहिलीच टेस्ट मॅच होती. न्यूझीलंडची टीम पहिल्या इनिंगमध्ये केवळ 112 रन्स करू शकली होती. त्यानंतर कॅप्टन हॅरॉल्ड गिलिगनच्या (Harold Gilligan) नेतृत्वाखाली उतरलेल्या इंग्लंडनं पहिल्या इनिंगमध्ये 181 रन्स करून आघाडी घेतली. न्यूझीलंडची टीम दुसऱ्या इनिंगमध्येही विशेष खेळ करू शकली नाही. 131 रन्सवर त्यांची टीम ऑलआऊट झाली. विजयासाठी मिळालेलं 63 रन्सचं टार्गेट इंग्लंडनं 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. अशा प्रकारे इंग्लंडनं ही मॅच 8 विकेट्नं जिंकली होती.

  हे वाचा-शिष्यांचे गुरुच्या पावलावर पाऊल, Team India ने ग्राउंड्समनला रुपये दिले 35,000

  11 जानेवारीला वेस्टइंडीजमध्ये सुरू झाली होती दुसरी मॅच

  इंग्लंडची एक टीम न्यूझीलंडमध्ये टेस्ट मॅच खेळत होती तर दुसरी टीम 11 जानेवारी 1930 पासून वेस्ट इंडिजमध्ये (England vs West Indies) टेस्ट खेळत होती. ही मॅच संपूर्ण 5 दिवस चालली. पहिल्यांदा बॅटिंग करून वेस्ट इंडिजनं पहिल्या इनिंगमध्ये 369 रन्स केले. त्यानंतर कॅप्टन फ्रेडी कॅल्थॉर्पच्या (Freddie Calthorpe) नेतृत्वाखाली ग्राऊंडमध्ये उतरलेल्या इंग्लंडनं पहिल्या इनिंगमध्ये 467 रन्सची आघाडी घेतली.

  वेस्टइंडीजनं दिलं होतं 287 रन्सचं टार्गेट

  वेस्ट इंडिजनं आपल्या दुसऱ्या इनिंगमध्ये 384 रन्स केले. त्यातून इंग्लंडची आघाडी वजा केल्यास इंग्लंडला 287 रन्सचं आव्हानात्मक टार्गेट मिळालं होतं. चौथ्या इनिंगमध्ये हे टार्गेट गाठणं त्यावेळी कठीण गोष्ट होती. पाचव्या दिवसाअखेर इंग्लंडच्या टीमनं 65 ओव्हर्समध्ये 3 विकेट्सच्या बदल्यात 167 रन्स केले होते. परिणामी ही मॅच ड्रॉ झाली. इंग्लंडनं एकाच वेळी 2 देशांमध्ये दोन टेस्ट मॅच खेळून नवीन विक्रम प्रस्थापित केला. इंग्लंडनं एकाच वेळी 22 इंटनॅशनल प्लेयर्स तयार केले होते म्हणजे इंग्लंड या देशाच्या दोन टीम्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत होत्या, ही देखील वाखाणण्याजोगी बाब आहे.

  हे वाचा-Ashes Series पूर्वी इंग्लंडला मोठा धक्का; जेम्स अँडरसन गाबा कसोटीत खेळणार नाही

  1000 पेक्षा जास्त टेस्ट खेळणारी एकमेव टीम

  आजच्या घडीला 1000 हून अधिक टेस्ट मॅच खेळणारा इंग्लंड हा जगातील एकमेव देश आहे. इतर कोणत्याही देशाच्या टीमनं आतापर्यंत 850 सामन्यांचा आकडाही पार केलेला नाही. इंग्लंडनं आतापर्यंत एकूण 1हजार 40 टेस्ट मॅच खेळल्या आहेत. त्यापैकी 378 जिंकल्या आहेत तर 311 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. 351 टेस्ट ड्रॉ झाल्या आहेत. 843 टेस्ट मॅच खेळून ऑस्ट्रेलिया (Australia) दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियानं 394 टेस्ट जिंकल्या आहेत तर 226 मध्ये त्यांचा पराभव झाला आहे. त्यांच्या 2 मॅच टाय झाल्या असून 212 मॅच ड्रॉ राहिल्या आहेत. टीम इंडियाचा विचार केला तर आतापर्यंत आपण एकूण 557 टेस्ट खेळल्या आहेत. जास्त टेस्ट खेळणाऱ्या देशांमध्ये आपला चौथा क्रमांक लागतो. 557 पैकी आपण 165 टेस्ट जिंकल्या आहेत, तर 171 मध्ये पराभव पत्करावा लागला आहे. 1 मॅच टाय झाली आहे तर 220 मॅच ड्रॉ राहिल्या आहेत.

  First published:

  Tags: Cricket, Cricket news