ब्रिस्टल, 20 जून : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात सध्या साऊथम्पटनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ऐतिहासिक फायनल (WTC Final) सुरु आहे. त्याचवेळी भारतीय महिला टीमनं (India Women Team) इंग्लंडमधील ब्रिस्टल टेस्टमध्ये इतिहास रचला आहे. भारतीय टीमनं पहिल्या इनिंगमध्ये फॉलो ऑन मिळाल्यानंतरही इंग्लंड विरुद्धची टेस्ट ड्रॉ करण्याची अविश्वसनीय कामगिरी केली आहे.
आठव्या क्रमांकावर बॅटींगला आलेल्या स्नेह राणा (Sneh Rana) हिने झुंजार खेळ करत टीम इंडियाला पराभवाच्या जबड्यातून बाहेर काढले. स्नेहनं ह राणाने 154 बॉलमध्ये नाबाद 80 रन केले. नवव्या आणि दहाव्या क्रमांकावरच्या शिखा पांडे (Shikha Pandey) आणि तानिया भाटीया (Taniya Bhatia) यांनी स्नेहला उत्कृष्ट साथ दिली. शिखा पांडेने 18 रन केले तर तानिया भाटीया 44 रनवर नाबाद राहिली. अखेरच्या इनिंगमध्ये भारताने 8 आऊट 344 एवढा स्कोअर केला.
इंग्लंड दौऱ्यापूर्वी वडिलांचे निधन
इंग्लंड दौऱ्यावर निवड होण्यापूर्वी स्नेहच्या वडिलांचे निधन झाले होते. स्नेहनं पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर सांगितले होते की, "या दौऱ्यासाठी टीमची घोषणा होण्याच्या काही दिवस आधी माझ्या वडिलांचे निधन झाले होते. तो माझ्यासाठी एक एक भावनिक क्षण होता. मला भारतीय टीममध्ये पुन्हा खेळताना पाहण्याची त्यांची इच्छा होती. पण दुर्दैवाने तसं झालं नाही. ठीक आहे. हा सर्व आयुष्याचा भाग आहे. त्यांच्या जाण्यानंतर मी जे काही केलं आहे, किंवा करणार आहे ते त्यांना समर्पित करणार आहे."
विराट कोहलीसाठी आजचा दिवस आहे खास, 10 वर्षांपूर्वी घडला होता इतिहास
पाच वर्षांनंतर पुनरागमन
स्नेह राणानं पाच वर्षांनंतर भारतीय टीममध्ये पुनरागमन केलं आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील चांगल्या कामगिरीचं बक्षिस तिला मिळालं आहे. स्नेह दुखापतीमुळे एक वर्ष क्रिकेटपासून दूर होती. त्यानंतर तिने सातत्यानं चांगली कामगिरी करत टीममध्ये पुनरागमन केलं. ब्रिस्टल टेस्टमध्ये स्नेहनं बॅटींग प्रमाणे बॉलिंगमध्ये जोरदार कामगिरी करत 4 विकेट्स घेतल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs england