Home /News /sport /

IND W vs ENG W : इंग्लंड दौऱ्यापूर्वी वडिलांना गमावले, टीम इंडियाच्या खेळाडूची पदार्पणातच कमाल

IND W vs ENG W : इंग्लंड दौऱ्यापूर्वी वडिलांना गमावले, टीम इंडियाच्या खेळाडूची पदार्पणातच कमाल

भारतीय महिला क्रिकेट टीमची स्पिनर स्नेह राणा (Sneh Rana Test Debut) टेस्ट क्रिकेटमध्ये संस्मरणीय पदार्पण केले. इंग्लंड दौऱ्यावर निवड होण्यापूर्वी स्नेहच्या वडिलांचे निधन झाले होते.

    ब्रिस्टल, 17 जून : भारतीय महिला क्रिकेट टीमची स्पिनर स्नेह राणा  (Sneh Rana Test Debut) टेस्ट क्रिकेटमध्ये संस्मरणीय पदार्पण केले. पहिल्या दिवशी तिने भारताकडून सर्वात जास्त 3 विकेट्स घेतल्या. इंग्लंड दौऱ्यावर निवड होण्यापूर्वी स्नेहच्या वडिलांचे निधन झाले होते. स्नेहनं तिचा पहिल्या दिवसाचा खेळ वडिलांना समर्पित केला आहे. स्नेहनं पहिल्या दिवसाचा खेळ  संपल्यानंतर सांगितले की, "या दौऱ्यासाठी टीमची घोषणा होण्याच्या काही दिवस आधी माझ्या वडिलांचे निधन झाले होते. तो माझ्यासाठी एक एक भावनिक क्षण होता. मला भारतीय टीममध्ये पुन्हा खेळताना पाहण्याची त्यांची इच्छा होताी. पण दुर्दैवाने तसं झालं नाही. ठीक आहे. हा सर्व आयुष्याचा भाग आहे. त्यांच्या जाण्यानंतर मी जे काही केलं आहे, किंवा करणार आहे ते त्यांना समर्पित करणार आहे." ब्रिस्टल टेस्टच्या पहिल्या दिवशी शेवटच्या सत्रामध्ये इंग्लंडनं चार विकेट्स गमावल्या. त्यावर बोलताना स्नेहनं सांगितल, " पिच सुरुवातीपासूनच स्लो होते. पण या पिचवर बॉल टर्न होत होता. माझ्या मते यापुढेही पिच असंच असेल." इंग्लंडनं टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला. इंग्लंडनं पहिल्या दिवसअखेर 6 आऊट 269 रन काढले. कॅप्टन हिथर नाईटनं सर्वात जास्त 95 रन काढले. स्नेहनं पहिल्या दिवशी टॅमी ब्यूमोट, एमी जोन्स आणि जॉर्जिया एल्विस या तिघींना आऊट केले. माजी भारतीय क्रिकेटपटूचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन पाच वर्षांनंतर पुनरागमन स्नेह राणानं पाच वर्षांनंतर भारतीय टीममध्ये पुनरागमन केलं आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील चांगल्या कामगिरीचं बक्षिस तिला मिळालं आहे. स्नेह दुखापतीमुळे एक वर्ष क्रिकेटपासून दूर होती. त्यानंतर तिने सातत्यानं चांगली कामगिरी करत टीममध्ये पुनरागमन केलं. काही झालं तरी आशा सोडता कामा नये, असं तिनं यावेळी सांगितलं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, India vs england

    पुढील बातम्या