मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : स्मृती मंधानाची आक्रमक खेळी व्यर्थ, इंग्लंडकडून भारताचा पराभव

IND vs ENG : स्मृती मंधानाची आक्रमक खेळी व्यर्थ, इंग्लंडकडून भारताचा पराभव

भारत विरुद्ध इंग्लंड (India W vs England W) यांच्यात झालेली तिसरा आणि शेवटचा टी20 सामना इंग्लंडने 8 विकेट्सने जिंकला. या विजयाबरोबरच इंग्लंडने तीन सामन्यांची ही मालिका 2-1 ने जिंकली आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 15 जुलै : भारत विरुद्ध इंग्लंड (India W vs England W) यांच्यात झालेली तिसरा आणि शेवटचा टी20 सामना इंग्लंडने 8 विकेट्सने जिंकला. या विजयाबरोबरच इंग्लंडने तीन सामन्यांची ही मालिका 2-1 ने जिंकली आहे. भारतीय टीमच्या इंग्लंड दौऱ्यातील एकमेव टेस्ट ड्रॉ झाली होती. त्यानंतर इंग्लंडने वन-डे मालिका 2-1 ने जिंकली. टी 20 मालिका जिंकून या दौऱ्याचा शेवट गोड करण्याचं भारतीय महिलांचं स्वप्न अपूर्ण राहिलं. स्मृती मंधानाची आक्रमक खेळी पहिल्या बॅटींगला आलेल्या भारतीय टीमची सुरुवात खराब झाली. आक्रमक बॅटर शफाली वर्मा (Shafali Verma) शून्यावरच आऊट झाली. त्यानंतर हरलीन देओलही (Harleen Deol) फक्त 6 रन काढून परतली. हरलीन आऊट झाल्यानंतर कॅप्टन हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) आणि स्मृती मंधाना (Smriti Mandhana) यांची जोडी जमली. सुरुवातीला बसलेल्या दोन धक्क्यांनंतरही स्मृती-हरमनप्रीत जोडीनं आक्रमक खेळ केला. या मालिकेत फार फॉर्मात नसलेली हरमनप्रीत चांगल्या रंगात होती. तिने 26 बॉलमध्ये 5 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीनं 36 रन काढले. या जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी 68 रनची पार्टनरशिप केली. हरमनप्रीत आऊट झाल्यानंतर स्मृतीनं भारतीय इनिंगची सूत्रं हाती घेतली. 42 बॉलमध्येच हाफ सेंच्युरी पूर्ण केली. अखेर स्मृती 51 बॉलमध्ये 70 रन काढून आऊट झाली. स्मृती आऊट झाल्यानंतर रिचा घोष (Richa Ghosh) हिनं केलेल्या आक्रमक फटकेबाजीमुळे भारताने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 आऊट 153 पर्यंत मजल मारली. रिचानं 13 बॉलमध्ये 20 रन काढले. मोठी बातमी! टीम इंडियात कोरोनाचा शिरकाव; एका प्लेअरचा Covid19 रिपोर्ट पॉझिटिव्ह इंग्लंडचा आक्रमक खेळ 154 रनचं आव्हान इंग्लंडनं डॅनियल वेट (Danni Waytt) आणि नॅट स्किवर (Nat Sciver) यांच्या खेळीच्या जोरावर 8 विकेट्स राखून पूर्ण केली. स्किवरनं 42 रन काढले. तर डॅनियल 89 रन काढून नाबाद राहिली.
First published:

Tags: Cricket, India vs england

पुढील बातम्या