मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG: लीड्स टेस्टमध्ये जसप्रीत बुमराह करणार सर्वात वेगवान शतक!

IND vs ENG: लीड्स टेस्टमध्ये जसप्रीत बुमराह करणार सर्वात वेगवान शतक!

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरी टेस्ट (India vs England Third Test) बुधवारपासून सुरु होणार आहे. टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) या टेस्टमध्ये अनोखा रेकॉर्ड करण्याची संधी आहे.

मुंबई, 23 ऑगस्ट: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरी टेस्ट (India vs England Third Test) बुधवारपासून सुरु होणार आहे. ही टेस्ट जिंकून या सीरिजमध्ये 2-0 अशी आघाडी घेण्याची संधी टीम इंडियाला आहे. त्याचबरोबर आणखी एका खास रेकॉर्डकडं भारतीय फॅन्सचं या टेस्टमध्ये लक्ष असणार आहे. टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) या टेस्टमध्ये अनोखा रेकॉर्ड करण्याची संधी आहे.

इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या या सीरिजमध्ये बुमराहनं आत्तापर्यंत 12 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या संपूर्ण रेकॉर्डचा विचार केला तर बुमराहनं 22 टेस्टमध्ये 22.62 च्या सरासरीनं 95 विकेट्स घेतल्या आहेत. याचा अर्थ तो 100 टेस्ट विकेट्स पासून फक्त 5 विकेट्स दूर आहे.

बुमराहनं लीड्स टेस्टमध्ये विकेट्सची सेंच्युरी केली तर तो सर्वात वेगवान 100 टेस्ट विकेट्स घेणारा भारतीय फास्ट बॉलर बनेल. सध्या हा रेकॉर्ड कपिल देवच्या (Kapil Dev) नावावर आहे. कपिलनं 25 टेस्टमध्ये हा रेकॉर्ड पूर्ण केला होता. बुमराहनं लीड्स टेस्टमध्ये आणखी 5 विकेट्स घेतल्या तर तो कपिलचा हा रेकॉर्ड मोडेल. कारण, बुमराहच्या कारकिर्दीमधील ही 23 वी टेस्ट मॅच असेल.

10 वर्षांनी टीममध्ये परतलेल्या खेळाडूनं दहा मॅचमध्ये दाखवला पाकिस्तान बोर्डाला आरसा

टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद फास्ट विकेट घेण्याचा विक्रम इंग्लंडच्या जॉर्ज लोहमॅनच्या नावावर आहे. लोहमॅननी 16 टेस्टमध्येच 100 विकेटचा पल्ला गाठला होता. तर भारताकडून आर.अश्विन सगळ्यात जलद 100 विकेट घेणारा बॉलर आहे. अश्विनने फक्त 18 मॅचमध्ये विकेटचं शतक पूर्ण केलं होतं. इरापल्ली प्रसन्न यांनी 20 टेस्टमध्ये, अनिल कुंबळेने 21 टेस्टमध्ये सुभाष गुप्ते यांनी 22 टेस्टमध्ये, बीएस चंद्रशेखर आणि प्रग्यान ओझा यांनी 22, विनू मंकड यांनी 23, रविंद्र जडेजाने 24 टेस्टमध्ये 100 विकेट घेतल्या.

भारतीय फास्ट बॉलर्सचा विचार केला तर इरफान पठाण (Irfan Pathan) याने 28 टेस्टमध्ये आणि मोहम्मद शमीने (Mohammad Shami) 29 टेस्टमध्ये हा विक्रम केला होता. इशांत शर्माला 100 विकेट घ्यायला 33 टेस्ट लागल्या होत्या.

First published:
top videos

    Tags: Cricket news, India vs england, Jasprit bumrah