INDvsAUS : मालिका विजयासह ऑस्ट्रेलियाने रचला इतिहास, केले 8 विक्रम

पहिले दोन्ही सामने जिंकल्यानंतर भारताचा मालिकेत पराभव

  • Share this:

ऑस्ट्रेलियाने दिल्लीत झालेल्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारतावर 35 धावांनी विजय मिळवून पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका 3-2 ने जिंकली. पहिले दोन्ही सामने गमावल्यानंतर मालिका विजय मिळवणारा ऑस्ट्रेलिया पहिलाच संघ ठरला आहे. गेल्या दोन वर्षातील त्यांचा हा पहिलाच मालिका विजय आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा मायदेशातील हा पहिलाच मालिका पराभव आहे. एवढंच नाही तर पहिल्यांदा विराटच्या नेतृत्वात भारताने सलग तीन सामने गमावले.

देशात सलग सहा द्विपक्षीय मालिका विजयानंतर भारताचा मालिकेत पराभव झाला आहे. तर ऑस्ट्रेलियाने सहा मालिका गमावल्यानंतर ही मालिका जिंकली.

भारतीय संघाने पाच किंवा त्यापेक्षा जास्त सामन्यात 2-0 ने आघाडी घेतल्यानंतरही पराभूत होणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. ऑस्ट्रेलियाच्या आधी पाकिस्तानने अशी कामगिरी केली होती.

ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी पाच सामन्यांच्या या मालिकेत 43 विकेट घेतल्या. भारताविरुद्ध अशी कामगिरी दोनवेळा करणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला संघ ठरला आहे. याआधी त्यांनी 2000-01 मध्ये 43 विकेट घेतल्या होत्या.

मालिकेत 2-0 ने मागे राहिल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने दोन वेळा तर ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि बांगलादेशने एकदा विजय मिळवली आहे.

भारताविरुद्धच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या पेंट कमिन्स आणि अॅडम झाम्पा यांनी अनुक्रमे 14 आणि 11 विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाच्या 2 गोलंदाजांनी एका मालिकेत भारताविरुद्ध भारतात दहा किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेण्याची दुसी वेळ आहे. यापूर्वी 2007-08 मध्ये मिशेल जॉन्सन आणि ब्रॅड हॉजने असे केले होते.

उस्मान ख्वाजा शेवटच्या सामन्याचा सामनावीर आणि मालिकावीरही ठरला आहे. तो भारतात भारताविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा परदेशी खेळाडू  ठरला आहे. त्याने एबी डिव्हिलियर्सच्या 358 धावांचा विक्रम मोडला. उस्मान ख्वाजाने मालिकेत 383 धावा केल्या. यात दोन शतके आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

First published: March 14, 2019, 9:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading