भारताने ईस्ट आफ्रिकेविरुद्ध जिंकला होता पहिला सामना, असा आहे 500व्या विजयापर्यंतचा प्रवास

भारताने पाकिस्तानविरुद्ध आतापर्यंत 54 वेळा विजय मिळवला आहे तर...

News18 Lokmat | Updated On: Mar 6, 2019 04:21 PM IST

भारताच्या क्रिकेट संघाने नागपूरमध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला 8 धावांनी पराभूत केले. यासह मालिकेत भारताने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा हा 133 सामन्यातील 49 वा विजय ठरला आहे. तर भारताने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 500 वा विजय साजरा केला.

भारताने पहिला विजय 1975 मध्ये ईस्ट आफ्रिकेला पराभूत करून केला. तर 500 वा विजय 2019 मध्ये मिळवला. सचिन तेंडुलकर(234) धोनी (195) आणि युवराज सिंग (171) यांचाही विजयात वाटा राहिला आहे.

मोहम्मद अझरूद्दीन यांच्या नेतृत्वाखाली भारताने 100 वा विजय मिळवला. त्यानंतर 200 वा विजय सौरव गांगुली तर 300 वा विजय राहुल द्रविड कर्णधार असताना मिळाला. 400 वा विजय महेंद्रसिंग धोनीच्या तर 500 वा विजय विराटच्या नेतृत्वाखाली मिळवला. भारताला पहिला विजय एस वेंकटराघवन यांच्या नेतृत्वाखाली मिळाली होती. तर भारताचे पहिले कर्णधार अजित वाडेकर हे होते.

Loading...

भारताने आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये 963 सामने खेळले आहेत. त्यापैकी 500 सामन्यात विजय तर 428 वेळा पराभव स्वीकारावा लागला आहे.  9 सामने अनिर्णित राहिले तर 40 सामन्यांचा काहीच निकाल लागला नाही. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारत 500 विजय मिळवणारा दुसरा संघ आहे. यापूर्वी ही कामगिरी ऑस्ट्रेलियाने (558) केली आहे. तर पाकिस्तान (479) तिसऱ्या क्रमांकावर आहे.

भारताने श्रीलंकेविरुद्ध आतापर्यंत सर्वाधिक सामने खेळले आहेत. 158 सामन्यात 90 विजय मिळवले आहेत. तर 56 सामन्यात पराभव झाला आहे. एक सामना अनिर्णित राहिला असून 11 सामन्याचां निकाल लागला नाही.

वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात 126 एकदिवसीय सामने झाले आहेत. यात 59 वेळा भारत तर 62 वेळा वेस्ट इंडिजने विजय़ मिळवला आहे.

न्यूझीलंडविरुद्ध भारताने 106 पैकी 55 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 45 सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला आहेत. यापैकी एक अनिर्णित राहिला तर पाच सामन्यांचा निकाल लागला नाही. पाकिस्तानविरुद्ध भारताने 131 सामन्यात 54 विजय मिळवले तर 73 पराभव झाले आहेत. इंग्लंडविरुद्ध भारताने 99 सामन्यातील 53 सामने जिंकले तर 41 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने 133 सामन्यात 49 विजय मिळवले असून 74 वेळा कांगारुंच्या संघाने विजय मिळवला आहे. तर 10 सामन्यांचा निकाल लागला नाही.

झिम्बॉम्बेविरुद्ध भारताने आतापर्यंत 63 सामन्यात 51 विजय मिळवले आहेत. तर 10 पराभव झाले आहेत. याशिवाय दोन सामने अनिर्णित राहिले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 83 सामन्यात 34 विजय तर 46 वेळा भारताचा पराभव झाला आहे.

बांगलादेश आणि भारत यांच्यात 35 सामने खेळण्यात आले आहेत. त्यातील 29 सामन्यात भारत विजयी झाला आहे. तर पाच सामन्यात भारताचा पराभव झाला. आयर्लंडविरुद्ध भारताने तीनही सामने जिंकले आहेत. तर अफगाणिस्तानविरुद्ध दोन पैकी एक जिंकला तर एक अनिर्णित राहिला आहेत. याशिवाय भारताने युएईविरुद्ध तीन, नेदरलँड विरुद्ध दोन, हाँगकाँगविरुद्ध दोन, केनियाविरुद्ध 11, तर स्कॉटलँड, बर्म्युडा, ईस्ट आफ्रिका आणि नामीबिया यांच्याविरुद्ध एक विजय मिळवला आहे.

भारताच्या 100 व्या विजयावेळी विनोद कांबळी, 200 वा विजय अनिल कुंबळे, 300 वा विजय दिनेश कार्तिक, 400 आणि 500 वा विजय झालेल्या सामन्यात विराट कोहली सामनावीर होते.

भारतीय क्रिकेटमध्ये आपल्या जबरदस्त कामगिरीने सचिन तेंडुलकर आणि महेंद्र सिंग धोनीने एक वेगळी उंची प्राप्त केली आहे. भारताच्या 500 विजयांपैकी 100, 200 आणि 300 व्या विजयावेळी सचिन तेंडुलकर साक्षीदार होता. तर धोनी 300, 400 आणि 500 व्या विजयाचा साक्षीदार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 6, 2019 04:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...